बायको नांदायला येईना… चिडलेला नवरा कोयता घेऊन डायरेक्ट तिच्या माहेरी गेला आणि….
तु माझ्या सोबत नांदायला का येत नाही ? तुला आता जिवंत ठेवत नाही असं म्हणतं हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने पतीने पत्नीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सासरवाडीच्या मंडळींवर देखील हल्ला केला आहे.
पुणे : पती पत्नीमध्ये विविध कारणांवरुन वाद होतात. बऱ्याचदा हे वाद विकोपाला जातात आणि पती-पत्नी विभक्त होण्याचा निर्णय घेतात. माहेरी राहणाऱ्या पत्नीवर पतीने कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील इंदापपूर येथे घडली आहे. तु माझ्या सोबत नांदायला का येत नाही ? तुला आता जिवंत ठेवत नाही असं म्हणतं हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने पतीने पत्नीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सासरवाडीच्या मंडळींवर देखील हल्ला केला आहे. जनार्दन गोविंद गाडे (रा.न्हावरा गुनाट वाहिर जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे. शुभम शिवाजी शेलार (वय 23 वर्षे, रा.पळसदेव ता. इंदापुर जि. पुणे) याने इंदापूर पोलिस ठाण्यात जनार्दन विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जनार्धन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणतं पत्नीवर हल्ला केला
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (ता.26) रात्री 9:30 च्या दरम्यान आरोपी जनार्दन हा फिर्यादी यांच्या पळसदेव येथील घरी आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करत तु माझ्या सोबत नांदायला का येत नाही ? तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणतं हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याचा पत्नीला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यावर वार केला. दरम्यान आरोपीने पत्नीच्या उजव्या हाताचे मनगटावर वार केल्याने पत्नी ही घरात कोसळली गेली.
सासुवरही जावयाने हल्ला केला
दरम्यान तक्रारदाराची आई पतीला सोडवण्यासाठी गेली. यावेळी जनार्दन याने त्यांच्याही पाठीत कोयता उलटा मारुन त्यांना ही दुखापत केली आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर जनार्दन गाडे याने साररच्या सर्वांना तुम्ही सर्वजन आता माझ्या तावडीतून वाचला आहे.परंतु पुढे माझ्या तावडीतुन वाचणार नाही अशी धमकी देऊन तो पळून गेला.
यानंतर शुभम याने पोलिस ठण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.