लग्नात काही दिले नाही म्हणून नाराज होता, हुंड्याच्या हव्यासापोटी स्वतःच्या हातानेच संसाराचा खेळखंडोबा केला !

लग्नात सासरवाडीतून हुंडा मिळाला नाही म्हणून पती नाराज होता. या रागातून तो पत्नीचा छळ करत होता. अखेर त्याने जे केले त्यानंतर दोन मुले आईच्या मायेला पोरके झाली.

लग्नात काही दिले नाही म्हणून नाराज होता, हुंड्याच्या हव्यासापोटी स्वतःच्या हातानेच संसाराचा खेळखंडोबा केला !
हुंड्यासाठी पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 4:53 PM

बीड / महेंद्र मुधोळकर : लग्नात हुंड्यात काहीच दिले नसल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माजलगावच्या भाटवडगाव येथे ही घटना घडली. पतीच्या या कृत्यामुळे दोन मुले अनाथ झाली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. अनंत सुगडे असे अटक आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी महिलेचा भाऊ प्रथमेश प्रकाश पंडित यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनंत भागवत सुगडे विरुद्ध 133 / 2023 कलम 302, 498 प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पीएसआय दाभाडे हे करीत आहेत.

पत्नीच्या माहेरची परिस्थिती बिकट असल्याने लग्नात काही दिले नाही

अनंत सुगडे आणि प्रतिभा सुगडे याचे 2017 मध्ये लग्न झालं होतं. प्रतिभा आणि अनंतला 5 वर्षाची मुलगी आणि 2 वर्षाचा मुलगा आहे. प्रतिभाच्या माहेरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. त्यामुळे तिच्या माहरचे लग्नात तिच्या पतीला काहीच देऊ शकले नव्हते. याचाच राग अनंतच्या मनात धुमसत होता. अनंत लाईट फिटिंगचे काम करतो, त्याला दारूचे व्यसन होते. पहिली मुलगी झाल्यापासूनत तो प्रतिभाचा छळ करत होता.

लग्नात काही दिले नाही म्हणून पत्नीवर हल्ला

याच रागातून अनंत प्रतिभाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. अखेर गुरुवारी त्याने धारदार हत्याराने वार पत्नीवर वार केले. यात हल्ल्यात प्रतिभा गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तात्काळ माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर अधिक उपचारासाठी तिला नंतर बीड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.