बायकोने दारूला पैसे दिले नाही, नवऱ्याची सटकली आणि त्याने थेट…घटना ऐकून मन सुन्न होईल
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील सांबरवाडी येथे क्षुल्लक कारणावरून खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी ( नाशिक ): दारूच्या नशेत कुणी काय करेल याचा काही नेम नसतो. अगदी क्षुल्लक कारणावरूनही अनेकांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. यामध्ये दारू पिण्यासाठी पन्नास रुपये दिले नाही म्हणून पतीने केलेल्या कृत्याने ( Nashik Crime News ) इगतपुरी तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरातील सांबरवाडी येथे धक्कादायक घटना आघालडी आहे. पैसे न देण्याचा राग आल्याने पतीने पत्नीलाच संपविले आहे. लोखंडी रॉड बायकोच्या डोक्यात मारून बायकोची हत्या केली आहे. यामध्ये मुलानेच वडिलांच्या विरोधात फिर्याद दिली असून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा ( Murder News ) दाखल करण्यात आला आहे.
क्षुल्लक कारणावरून ही खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीलाच संपविल्याने दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
इगतपुरी तालुक्यातील सांबरवाडी येथे राहणाऱ्या लालू सोपान मोरे याने आपल्या पत्नीचा खून केल्याची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. लालू मोरे याच्या सोबत पत्नीसह मुलगा आणि सून राहत होते.
मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा राकेश मोर याने आपले वडील लालू मोरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लालू मोरे यांची पत्नी हिराबाई मोरे यांच्याकडे पन्नास रुपये मागत होता.
आधीच लालू मोरे हा दारू पिलेला असल्याने पत्नी हिराबाई यांनी पैसे देण्यात नकार दिला. लालू मोरे याला राग आल्याने तो घरून बाहेर निघून गेला. नंतर हिराबाई या घरात आणि मुलगा आणि सून बाहेर पडवीत झोपून गेले होते.
सर्व झोपून गेल्यावर रात्री उशिरा घरी आलेल्या लालू मोरे यांनी घरात आल्यावर दरवाजा लावून घेत मुसळ म्हणून वापरत असलेल्या लोखंडी रॉडचा वापर करत झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात रॉड मारला.
यामध्ये तोंडावर आणि डोक्यात रॉड मारल्याने हिराबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यावेळी आवाज आल्याने मुलगा आणि सून यांनी दरवाजा वाजविला त्यानंतर काही वेळाने वडीलांनी दरवाजा उघडला.
पाहताच क्षणी तुझ्या आईला मी मारून टाकले आहे काय करायचे करून घे म्हणत तिथून लालू मोरे निघून गेला. त्यानंतर मुलगा राकेश याने लागलीच रुग्णवाहिका बोलावून घेतली, त्यांनी तपासून आई मृत घोषित केले.
मुलगा राकेश यांनी पोलिसांना बोलावून याबाबत माहिती दिली आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस आरोपीचा शोध घेत असून या घटनेनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.