पोलिस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड पोलिसांच्या ताब्यात

Yavatmal News : पोलीस भरतीत प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीचा यवतमाळ पोलिसांनी छडा लावला आहे. बीड जिल्ह्यातील एका वकिलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.

पोलिस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड पोलिसांच्या ताब्यात
yavatmal policeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 8:34 AM

यवतमाळ : शासकीय नोकरीसाठी तरुण काय करतील याचा काही नेम नाही. यांच्या आगोदर सुद्धा अनेक तरुणांनी जातीचे बनावट (duplicate caste certificate) दाखल दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर काही जणांनी तर सध्या पोलिस भरती होण्यासाठी विविध पध्दतीच्या आयडीया लावल्या असल्याचं उघडकीस आलं आहे. बनावट ‘प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र’ जोडून एकाने पोलिस अधिकाऱ्यांची (police officer) चांगलीचं भंबेरी उडवली आहे. यवतमाळ पोलिसांच्या चलाखी पणामुळे हे सगळं प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे. अशा पद्धतीने प्रमाणपत्र तयार करुन देणारी टोळी असल्याचं पोलिस तपासात उघडकीस आलं आहे. यामध्ये एका वकिलाला सुध्दा पोलिसांनी अटक (yavatmal police) केली आहे.

वकिलचं निघाला या प्रकरणाचा…

बीड येथे राहणारा पांडुरंग ढलपे हा वकील आहे. त्याचबरोबर या रॅकेटचा मास्टरमाईंड तोचं असून तो बनावट प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र तयार करून देत होता. शिवाय स्वाक्षरी सुद्धा बनावट करत होता अशी माहिती यवतमाळ पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात सगळ्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच राज्यात इतर ठिकाणी यांच्यातला आणखी कोण आहे का ? याचा सुध्दा पोलिस शोध घेणार आहेत.

हे सुद्धा वाचा

टोळीचा पर्दाफाश केला

यवतमाळ पोलिस भरतीत पात्र ठरलेल्या एका 24 वर्षीय युवकाने प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र जोडून 30 नोव्हेंबर 2022 रोजी यवतमाळ येथील पोलिस भरतीसाठी अर्ज केला होता. चाचणीत तो उत्तीर्ण झाल्यानंतर 17 मे 2023 रोजी त्याचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा अंदाज यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अनिकेत पांडे यांना आला. त्यानंतर 19 मे रोजी त्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर लिपिक पांडे यांच्या तक्रारीवरून दराटी पोलिस ठाण्यात 420 नूसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामध्ये पोलिसांनी सखोल तपास करून या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.