Gujrat Murder : अहमदाबादमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले, वडिलांनीच हत्या केल्याचे निष्पन्न, कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या संपूर्ण प्रकरणाची उकल केली आहे. हा मृतदेह हितेश नावाच्या तरुणाचा असून त्याच्या वृद्ध वडिलांनी त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह हितेशचाच असल्याची पुष्टी झाली.

Gujrat Murder : अहमदाबादमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले, वडिलांनीच हत्या केल्याचे निष्पन्न, कारण अद्याप अस्पष्ट
अहमदाबादमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकललेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 7:30 PM

गुजरात : अहमदाबादमध्ये पाच दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. वडिलां (Father)नीच आपल्या तरुण मुलाची हत्या (Murder) केल्याचे निष्पन्न झाले आहे. हितेश असे मयत तरुणाचे नाव आहे. मात्र वडिलांनी आपल्याच मुलाची हत्या का केली याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेत कसून चौकशी (Inquiry) केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. एम.जानी असे आरोपीचे नाव असून तो निवृत्त क्लास 2 अधिकारी सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपीने तरुणाची हत्या करुन धडापासून डोके, हात, पाय कापून वेगळे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. मृतदेहाचे धड आणि पाय सापडले असून आरोपीने डोके व हात कोठे फेकले याचाही शोध घेण्यात येत आहे.

पाच दिवसांपूर्वी झाली होती हितेशची हत्या

पाच दिवसांपूर्वी वसना परिसरात पोलिसांना एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे डोके, पाय आणि हात नव्हते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तपास सुरू असतानाच, वसनापासून 3 किमी अंतरावर असलेल्या एलिसब्रिज परिसरात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून त्या व्यक्तीचे छिन्नविछिन्न पाय पॉलिथिनमध्ये सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या संपूर्ण प्रकरणाची उकल केली आहे. हा मृतदेह हितेश नावाच्या तरुणाचा असून त्याच्या वृद्ध वडिलांनी त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह हितेशचाच असल्याची पुष्टी झाली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक

पोलिसांनी एलिसब्रिज परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी स्कूटरवरुन आलेला एक वृद्ध पॉलिथिन फेकताना दिसला. पोलिसांनी स्कूटरच्या नंबरवरुन तिची माहिती काढली. पोलीस जेव्हा स्कूटर मालकापर्यंत पोहोचले तेव्हा त्याने ही स्कूटर अंबावाडी परिसरातील एका वृद्धाला विकल्याचे समजले. त्या व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्कूटर वापरणाऱ्याच्या घरी पोहोचले. पोलीस घरी तेथे गेल्यानंतर सदर वृद्ध मोठा मुलगा हितेशसोबत राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वृद्धाच्या घराची झडती घेतली असता आतून धारदार चाकू आणि रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी तात्काळ वृद्धाला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. (The mystery of the murder of a young man in Ahmedabad is solved, the father himself killed him)

हे सुद्धा वाचा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.