तुमच्या घरात येणारं दूध विषारी तर नाही ना? मालेगावमध्ये झालेल्या कारवाईनं उडाली खळबळ, काय आहे प्रकरण
दूध वाढीसाठी वापरणाऱ्या ऑक्सिटॉसीनच्या कारखान्यावर मालेगाव पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. मात्र, कारवाईच्या नंतर तपासात समोर आलेल्या बाबी आणि शंका पाहून पोलीसही चक्रावले आहे.
मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव ( नाशिक ) : तुम्ही खरेदी करत असलेले दूध विशमुक्त आहे की नाही याची खात्री करण्याची वेळ वारंवार येत आहे. नुकतीच मालेगाव शहरात पोलीसांनी केलेल्या एका कारवाईवरुन विषारी दूध तर पीत नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अन्न औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी केलेल्या एका कारवाईवरुन हे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात गाई, म्हशीचे दूधवाढीसाठी ऑक्सिटॉसीन (oxytocin) या औषधाच्या निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. मालेगाव शहरात हा कारखाना सुरू होता. अनेक दूध उत्पादक गाई, म्हशीच्या दुधात वाढ होण्यासाठी ऑक्सिटॉसीनचं सेवन खाद्यपदार्थाच्या माध्यमातून जनावरांना देतात. त्यामुळे दुधावर त्याचा परिणाम दिसून येत असतो. आणि हेच ऑक्सिटॉसीन औषध मालेगाव सर्रासपणे तयार करून विक्री केले जात होते. पोलीसांच्या कारवाईनंतर हे समोर आल्यानं मालेगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी बेकायदा ऑक्सिटॉसीन औषधाची विक्री करणाऱ्या कारखान्यावर नाशिकच्या मालेगाव पोलिसांच्या करवाई नंतर उडाली खळबळ उडाली आहे.
मालेगावातील कारवाईत म्हाळदे शिवारात कारवाई करीत एका संशयिताला अटक केली. या ठिकणी चक्क ऑक्सिटॉसीन निर्मितीचा कारखानाच थाटला होता.
गाई, म्हशींच्या दूधवाढीसाठी ऑक्सिटॉसीन या ओैषधाची निर्मिती; तसेच त्याचे वितरण करणारे मोठे रॅकेट उघडीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑक्सिटॉसीन निर्मितीसाठी लागणारे सर्व साहित्य सह मोठ्या प्रमाणावर औषधाचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे.
या औषधाच्या निर्मितीमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याचा लवकरच भांडाफोड करणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी म्हंटले आहे.
मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणाऱ्या कारखान्यावरून त्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत असेल यांचा अंदाज बांधला जात आहे.
ऑक्सिटॉसीनच्या कारवाईअरुण किती मोठ्या प्रमाणात ऑक्सिटॉसीनचा वापर केला जात असेल यावरून पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
ऑक्सिटॉसीनचा वापर रोजच्या आहारात समावेश असलेल्या दुधात होत असेल टार मग त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असेल अशी शक्यताही नाकारता येत नाही.