शिवजयंतीची मिरवणूक पोलिसांची मोठी कारवाई; कोणत्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या रक्षकांकडे एअरगन?
नाशिकच्या भद्रकाली परिसरातील वाकडी बारव येथून पारंपारिक पद्धतीने शिवजयंतीच्या मिरवणुकीची सुरुवात झाली होती. त्या मिरवणुकीत मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वागता उपासनी सहभागी झालेल्या होत्या.
नाशिक : संपूर्ण राज्यासह 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. पण नाशिकमध्ये शिवजयंतीच्या ( Nashik Shivjayanti ) दरम्यान एक प्रकार समोर आल्याने खळबळ ( Nashik Crime ) उडाली आहे. शिवजयंतीच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष ( MNS Leader ) यांच्या रक्षकांकडे एयरगण आढळून आल्या होत्या. नाशिक पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी एयरगणसह रक्षकांना ताब्यात घेतले आहे. शिवजयंतीच्या दरम्यानचा ही संपूर्ण घटना घडल्याने खळबळ उडाली असून पोलीसांच्या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
नाशिकच्या भद्रकाली परिसरातील वाकडी बारव येथून पारंपारिक पद्धतीने शिवजयंतीच्या मिरवणुकीची सुरुवात झाली होती. त्या मिरवणुकीत मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वागता उपासनी सहभागी झालेल्या होत्या.
स्वागता उपासनी यांच्या समवेत यावेळेला रक्षकही होते. त्यातील दोघांच्या हातात एअरगण असल्याचे नागरिकांना दिसले होते. त्यातील नागरिकांनी पोलिसांना ही बाब कळवली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी येत एयरगन ताब्यात घेतले होते.
त्यानंतर शिवजयंतीची मिरवणूक सुरू असतांनाच दोघांनाही यावेळी पोलीसांनी ताब्यात घेत भद्रकाली पोलीस ठाण्यात घेऊन आले होते. रात्री उशिरा पर्यन्त याबाबत तपास सुरू होता. अद्याप याबाबत गुन्हा दाखल झालेला नसला तरी पोलिसांचा तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांच्या पथकाकडून हा तपास सुरू असून एयरगन कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत तपास सुरू आहे. पोलीसांच्या तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष असलेल्या स्वागता उपासनी यांचीही याबाबत चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यन्त याबाबत पोलिसांचा तपास सुरू असल्याने या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक शहरात याबाबत जोरदार चर्चा होऊ लागली असून यामध्ये स्वागता उपासनी यांच्यावर कारवाई होते का ? रक्षकांनी एयरगण कोठून आणली? त्या एयरगन खऱ्या आहेत की खोट्या ? एयरगण असलेल्या रक्षकांना कशासाठी सोबत ठेवले होते असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.