कोयता गॅंगची दहशत मोडीत काढणाऱ्या पोलिसांना रिवॉर्ड, सोशल मीडियावर दोघही झाले हिरो

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात कोयता घेऊन धिंगाणा घालणाऱ्या संशयिताला भर रस्त्यातच चोप देऊन धडा शिकवणाऱ्या पोलिसांना 50 हजार रुपये बक्षीस जाहीर झाले आहे.

कोयता गॅंगची दहशत मोडीत काढणाऱ्या पोलिसांना रिवॉर्ड, सोशल मीडियावर दोघही झाले हिरो
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 12:04 PM

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी पुणेच्या सिंहगड रोड परिसरात कोयता गॅंगच्या दोघांनी दहशद निर्माण करण्यासाठी धिंगाणा घातला होता. त्यावेळी नागरिकांच्या तक्रारी नंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यातील एका पकडून भर रस्त्यात चोप दिला होता. याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये पुणे पोलीसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी कोयता गॅंगच्या संशयित आरोपीला शिकवलेला धडा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत कायम आहे. पुणे पोलीसांनी शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात कोयता गॅंग हाती लागेल यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असले तरी कोयता गॅंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच कोयता गॅंग हाती लागत नसली तरी दुसरीकडे दोन जिगरबाज पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे जोरदार कौतुक केले आहे. जिगरबाज पुणे पोलिसांना पन्नास हजारांचे रिवार्ड जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय सोशल मिडियावर दोघेही चर्चेत आले आहे.

पुण्यात कोयता गॅंगला धडा शिकवणाऱ्या दोन जिगरबाज पुणे पोलिसांना पन्नास हजार रुपयांचे रिवार्ड जाहीर झाले आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय दोन्हीही जिगरबाज पोलिसांचा सोशल मीडियावरही चांगलाच डंका निर्माण झाला आहे, फेसबुकवर 60 हजारांवर फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे.

कोयता गँगची नशा उतरविणारे पोलीस कर्मचारी धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले हीरो ठरले होते, तर पुण्यातील नागरिक दोन्ही पोलिसांचे  स्वागत करत आहे.

सिंहगड परिसरात कोयता गँगच्या सदस्यांना या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी चोप दिला त्यानंतर त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.