AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Crime | मावस बहिणीकडेच केली चोरी, चेहरा झाकला, टॉप बदलला, पण एका गोष्टीमुळे तिची चोरी पकडली गेली

कार्यक्रमादरम्यान प्रिया यांची नजर चुकवून सिमरनने त्यांच्या पर्समधील घराची चावी चोरली. यानंतर कार्यक्रमातून बाहेर पडत रिक्षा केली आणि प्रिया यांचे घर गाठले. आपली ओळख पटू नये म्हणून सिमरने पुरेपूर काळजी घेतली होती.

Dombivali Crime | मावस बहिणीकडेच केली चोरी, चेहरा झाकला, टॉप बदलला, पण एका गोष्टीमुळे तिची चोरी पकडली गेली
मावस बहिणीनेच केली बहिणीच्या घरी चोरीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 16, 2023 | 4:01 PM
Share

डोंबिवली : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी गुन्हा लपत नाही असं म्हणतात, याचाच प्रत्यय डोंबिवलीतील एका चोरीच्या घटनेत आला आहे. आजकाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी अनेकदा चोर हा ओळखीतलाच निघतो. या घटनेतही असच काहीसं घडलं आहे. डोंबिवलीत एका महिलेच्या घरात 40 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेचा तपास केला अन् एका चपलेने हा गुन्हा उघडकीस आणला. पोलीस तपासात पीडितेच्या मावस बहिणीनेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. चोरी करण्यासाठी तिने जी आयडीया वापरली ती ऐकून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.

डोंबिवलीतील महिला कामोठे येथे कार्यक्रमाला गेली होती

डोंबिवलीतील पलावा येथे राहणाऱ्या प्रिया सक्सेना या नवी मुंबईतील कामोठे येथे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. प्रिया यांची मावस बहीण सिमरन पाटील ही देखील या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

मावस बहिणीनेच पर्समधील चावी चोरुन दागिने लांबवले

कार्यक्रमादरम्यान प्रिया यांची नजर चुकवून सिमरनने त्यांच्या पर्समधील घराची चावी चोरली. यानंतर कार्यक्रमातून बाहेर पडत रिक्षा केली आणि प्रिया यांचे घर गाठले. आपली ओळख पटू नये म्हणून सिमरने पुरेपूर काळजी घेतली होती.

टॉप बदलला, तोंडाला स्कार्फ बांधला

रिक्षातच तिने आधीच्या टॉपवर दुसरा टॉप घातला. तोंडाला स्कार्फ बांधला. त्यानंतर सिमरने चावीने प्रिया यांच्या घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. कपाटातून 40 तोळे सोने चोरले आणि पुन्हा कार्यक्रमस्थळी सहभागी होत प्रिया यांच्या पर्समध्ये चावी ठेवली.

प्रिया सक्सेना या जेव्हा कार्यक्रम आटोपून घरी आल्या तेव्हा त्यांना दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक बाब कळली. यानंतर प्रिया यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली.

एका चप्पलने गुन्हा उघडकीस आणला

मानपाडा पोलिसांनी चोरीच्या घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांनी प्रिया यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेचा चेहरा दिसत नव्हता. मात्र महिलेच्या पायातील चप्पल सीसीटीव्हीत कैद झाली होती.

पोलिसांनी चोरीच्या तपासादरम्यान कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रिया यांच्या नातेवाईकांनाही चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी सिमरनही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आली होती.

यावेळी सीसीटीव्हीतील महिलेने घातलेली चप्पल आणि सिमरने घातलेली चप्पल सेम असल्याने पोलिसांना तिच्यावर संशय बळावला. पोलिसांनी सिमरनची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. एका चप्पलमुळे अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी चोरीचा छडा लावला.

पोलिसांनी आरोपी सिमरनला अटक केली असून, तिच्याकडून चोरीचे दागिनेही हस्तगत केले आहेत. मावस बहिणीनेच अशा पद्धतीने चोरी केल्याने परीसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.