ठुकरा के मेरा प्यार! ट्यूशन टीचरच विद्यार्थीनीच्या प्रेमात, 4 वर्षे केलं प्रपोज अन् एक दिवस… धक्कादायक घटना समोर

आतापर्यंत एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत, यामध्ये प्रेमवेड्या आशिकने टोकाचा निर्णय घेत जिच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिलीच तिच्यासोबतच त्यांनी घात केला आहे. अशातच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एक ट्यूशन टीचरच विद्यार्थीनीच्या प्रेमात पडला होता.

ठुकरा के मेरा प्यार! ट्यूशन टीचरच विद्यार्थीनीच्या प्रेमात, 4 वर्षे केलं प्रपोज अन् एक दिवस... धक्कादायक घटना समोर
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 11:01 PM

Crime News : आतापर्यंत एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत, यामध्ये प्रेमवेडे आशिक टोकाचा निर्णय घेत ज्या मुलीसोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिलीच तिच्यासोबतच त्यांनी घात केला आहे. अशातच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एक ट्यूशन टीचरच विद्यार्थीनीच्या प्रेमात पडला होता. सलग 4 वर्षे शिक्षक संबंधित विद्यार्थिनीला प्रपोज करत होता मात्र तिने कायम नकार दिला. शेवटी त्याने जे केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

आरोपी शिक्षक विद्यार्थीनीला शिकवायचा. काही दिवसानंतर त्याचं शिकवता शिकवता माझंविद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम होतं. त्याने अनेकदा तिच्यासमोर प्रेम व्यक्त केलं होतं. परंतु प्रत्येक वेळी तिने त्याला नकार दिला. सारखा सारखा तिचा नकार ऐकून तो रागावतो. त्यानंतर त्याने 4 जणांच्या मदतीने तरूणीला जबरदस्ती कारमधून घेऊन गेला. त्यानंतर त्यानं तरूणीची गळा दाबून हत्या केली. दीपक गुप्ता असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे.ही घटना झारखंड येथील कोडरमा जिल्हातील आहे.

हत्येनंतर पोलीस 6 दिवस तरूणीचा शोध घेत होते. मग संशयाच्या आधारावर पोलिसांनी सनकी आशिकला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्यासोबत सामिल झालेल्या अन्य 4 जणांना अटक केली आहे.

या प्रकरणातील पीडित 6 दिवसांपूर्वीच म्हणजेच 21 मार्च रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या दरम्यान पीडित तरूणीला काही युवकांनी टाटा सूमो कारमधून नेल्याचं काही लोकांनी पाहिलं होतं. त्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी ती माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर एकतर्फी आशिक दीपक गुप्ता आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे.

आरोपी दीपक गुप्ताची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला. त्यानं सांगितलं की, माझ्या 4 साथीदारांनी (संजय मेहता, संतोष मेहता, रोहित मेहता आणि भरत उर्फ ​​कारू) सोनीचे अपहरण केले. त्यावेळी रोहित मेहता टाटा सुमो गाडी चालवत होता. त्यानंतर सोनीला एका निर्जनस्थळी नेऊन तिचा गळा आवळून खून करण्यात आला. तसंच पुरावा नष्ट करण्यासाठी आम्ही तिचा मृतदेह पोत्यात भरून एका खड्डयात पुरला.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.