Husband Killed Wife : भयंकर! 6 मुलांच्या देखतच पत्नीचा मृतदेह कढईत उकळला! माथेफिरु पतीचं निर्दयी कृत्य

Wife Killed by Husband : पोलिसांनी याबाबत कळेपर्यंत आशिक आपल्या तीन मुलांना घेऊन फरार झाला होता

Husband Killed Wife : भयंकर! 6 मुलांच्या देखतच पत्नीचा मृतदेह कढईत उकळला! माथेफिरु पतीचं निर्दयी कृत्य
धक्कादायक घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 12:40 PM

पत्नीची पतीने हत्या (wife Murder) केली. उशीने तोंड दाबून पत्नीचा खून केला. इथपर्यंत नराधम पती थांबला नाही. तर यानंतर या माथेफिरु पतीने आपल्याच पत्नीचा मृतदेह चक्क कढईत उकळला. हे धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य पतीनं आपल्या सहा मुलांच्या देखतच केलंय. त्यामुळे ही सगळी मुलंही धास्तावली. ही धक्कादायक घटना पाकिस्तानच्या (Pakistan Crime News) सिंध प्रांतात घडली. बुधवारी ही धक्कादायक घटना समोर आली होती. नरगिस असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. जिओ न्यूजने याबाबतचं वृत्त दिलंय. पाकिस्तानच्या कराचीतील गुलशन-ए-इकबाल परिसरात ही भयंकर घटना उघडकीस आलीय. या घटनेनं एकच खळबळ उडाली. याप्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहे. ज्या ठिकाणी या महिलेचा मृतदेह (Murder Mystery) आढळून आला, ते ठिकाणही तब्बल 9 महिन्यांपासून बंद होतं.

नेमकं काय घडलं?

बुधवारी सिंध पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह नरगिस नावाच्या एका महिलेचा असल्याचं तपासातून समोर आलं. या महिलेचा पती एका शाळेत वॉचमनचं काम करत होता. गेल्या 9 महिन्यांपासून ही शाळा बंदच होती. या शाळेतच सर्वंट कॉर्टरमध्ये तो कुटुंबासोबत राहत होता. पोलिसांनी या दाम्पत्याच्या 15 वर्षांच्या मुलीनं माहिती दिली. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

मुलांच्या देखतच हडळकृत्य

नरगिसच्या पतीचं नाव आशिक असं आहे. पोलिसांनी याबाबत कळेपर्यंत आशिक आपल्या तीन मुलांना घेऊन फरार झाला होता. तर इतर तीन मुलांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी रवाना केलंय. ही धक्कादायक घटना पाहून मुलं धास्तावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलांच्या चौकशीतून पोलिसांना या हत्याकांडाबाबत धक्कादायक माहिती मिळाली.

हे सुद्धा वाचा

आपल्या वडिलांनी आधी आईच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये या माथेफिरु पतीने आपल्या पत्नीचं शव टाकलं आणि तिचा मृतदेह कढईमध्ये उकळला. यात या महिलेचा पाय शरीरापासून निखळला गेला होता. दरम्यान, विकृत मानसिकतेतून या पतीने हे कृत्य केलं असावं, असा संशय व्यक्त केला जातो आहे. पण नेमकं असं करण्यामागंच कारण काय, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याप्रकरणी पोलिसी अधिक तपास करत आहेत.

आरोपी पतीचा शोध सुरु

या माथेफिरु पतीने आपल्या पत्नीला अनैतिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं होतं. पण पत्नीनं नकार दिल्यानं संतापलेल्या पतीनं हे क्रूर पाऊल उचलत तिचा खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह कढईत उकळण्याचं निर्दयी कृत्य केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपी पतीला पकडण्याासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.