सकाळी कामावर गेलेली महिला परतलीच नाही, महिलेसोबत नेमकं काय घडलं?

मांडवी परिसरातील शिरसाड राऊत पाडा येथील ती राहणारी आहे. काल सकाळी कामावर ही महिला गेली होती. पण रात्री घरी पोहचलीच नाही.

सकाळी कामावर गेलेली महिला परतलीच नाही, महिलेसोबत नेमकं काय घडलं?
गोव्यातून बाईक चोरुन कोल्हापुरात विकणाऱ्या दुकलीला अटक
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 4:08 PM

प्रतिनिधी, पालघर : विरारच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. एका विहिरीत रात्री उशिरा महिलेचा संशयास्पद मृतदेह मिळाला. जागृती राऊत (वय 39) असे महिलेचे नाव आहे. मांडवी परिसरातील शिरसाड राऊत पाडा येथील ती राहणारी आहे. काल सकाळी कामावर ही महिला गेली होती. पण रात्री घरी पोहचलीच नाही. तिचा शोध घेतला असता बाजूच्या एका विहिरीत मृतदेह सापडला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली. जागृती यांनी आत्महत्या केली की, त्यांचा कुणी खून करून विहिरीत टाकलं याचा शोध पोलीस घेत आहेत.

जागृती घरी न आल्याने चिंता वाढली

याबाबत मांडवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. जागृती राऊत या मुळच्या मांडवी परिसरातील राहणाऱ्या. त्याचे वय ३९ वर्षांचे आहे. नेहमीप्रमाणे त्या काल सकाळी कामावर गेल्या. संध्याकाळी घरी येणे अपेक्षित होते. पण, त्या घरी आल्या नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.

विहिरीत सापडला मृतदेह

जागृती यांचे कुटुंबीय घाबरले. त्या कुठं गेल्या असतील, याचा शोध त्यांनी सुरू केला. नातेवाईकांना विचारपूस केली. जिथं कामावर जायची. त्यांच्याशी संपर्क साधला. पण, जागृती यांचा पत्ता लागला नाही. शेवटी आज सकाळी एका महिलेचा मृतदेह विहिरीत सापडल्याची घटना समोर आली. पाहतात तर तो मृतदेह जागृती राऊत यांचा होता.

जागृती यांची हत्या की आत्महत्या?

मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आली. विहिरीत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेजारील नागरिकांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर घटनेचा पंचनामा केला. तो मृतदेह जागृती राऊत यांचा असल्याचे समोर आले. जागृती यांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. जागृती यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करून मृतदेह विहिरीत ढकलण्यात आला,याचा शोध पोलीस घेत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.