नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस, मनमाडला दुकाने फोडली, घरात घुसून ऐवज लंपास, मंगळसूत्रही ओरबाडले
नाशिकच्या ग्रामीण भागात घरी कुणी नसताना कुलूप तोडून ऐवज लंपास केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थ करतायत. पूर्वी छोट्या चोऱ्या व्हायच्या. मात्र, आता चक्क दरवाजे तोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेलीय. या चोऱ्या रोखणे पोलिसांसमोर आव्हान आहे.
नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये चोरट्यांचा सुरू असलेला धुमाकूळ थांबायला तयार नाही. ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्या, मंगळसूत्र चोरी (Theft) यांचा सिलसिला सुरू आहे. आता मनमाडला दोन मोठी दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय. घरातू घुसून चोऱ्या केल्यात आणि सटाणा भागात एक मंगळसूत्र ओरबडल्याची तक्रार दाखल झालीय. मालेगाव, सटाणा, बागलाण, येवला पाठोपाठ चोरट्यांनी मनमाडला धुमाकूळ घालत एक मेडिकल, रेडिमेड कापडाचे शोरूमचे शटर आणि एका घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी (Police) सुरू केला आहे.
सीसीटीव्हीत कैद
मालेगावात सटाणा नाका भागात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 80 हजारांची पोत चालू गाडीवरून ओरबडल्याचा प्रकार घडला आहे. त्याच भागात मोबाईल दुकानात देखील चोरट्यांनी आपला हात सफाई केली आहे. सर्वच ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र, तरी देखील त्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश येत आहे. दुसरीकडे चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक, व्यापारी, दुकानदारांमध्ये भीती सोबत चिंता निर्माण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या सुरू असताना पोलिसांच्या हाती काही लागत नाही. त्यामुळे चोरट्यांची मौज सुरू आहे.
त्यांचाही सुगावा नाही…
मालेगावमधील कॅम्प पोलीस ठाण्याशेजारीच असलेल्या साईराम अलंकार व बालाजी भांडारची शटर वाकवून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व मोड लंपास केली. नंतर त्यांनी जाजूवाडी परिसरात मोर्चा वळवत लाखोंचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्या आधारावर कॅम्प आणि वडणेर खकुर्डी पोलिसांनी तपास सुरू केलाय. त्यांनी घटनास्थळी जात भेटही दिलीय. मात्र, चोरट्यांचा तपास लागत नाहीय.
भीतीचे वातावरण
बागलाणच्या नामपूर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, दोन दिवसांत घरफोड्या आणि दुकानफोड्यांचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी लाखोंच्या रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. घरावर पाळत ठेवून या चोऱ्या केल्या जात आहेत. घरी कुणी नसताना कुलूप तोडून ऐवज लंपास केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थ करतायत. पूर्वी छोट्या चोऱ्या व्हायच्या. मात्र, आता चक्क दरवाजे तोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेलीय. या चोऱ्या रोखणे पोलिसांसमोर आव्हान आहे.
इतर बातम्याः
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात