सांगलीतील चोरांचा कानपूरमध्ये डल्ला, 16 कोटींचे दागिने पळवले, नेपाळला पळून जाणार?; काय आहे प्रकरण?

संपत हा सांगलीचा आहे. सांगलीत भाड्याच्या घरात तो राहतो. त्यांनी बेकनगंजमध्ये एसआर गोल्ड टेस्टिंगच्या नावाने फॅक्ट्री बनवली होती. त्याच्यासोबत महेश म्हस्केही राहत होता. सोनं घेऊन पोबारा केल्यापासून दोघांनी मोबाईल बंद केला आहे. दोघेही फरार झाले आहेत. दोघांनीही जाण्यापूर्वी 20 हजार रुपये उधार मागितले होते. पोलीस आता या दोघांचाही कसून शोध घेत आहेत. त्यासाठी पोलिसांनी खबऱ्यांचं नेटवर्कही पेरलं आहे.

सांगलीतील चोरांचा कानपूरमध्ये डल्ला, 16 कोटींचे दागिने पळवले, नेपाळला पळून जाणार?; काय आहे प्रकरण?
Thieves from SangliImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 4:41 PM

सांगली | 9 डिसेंबर 2023 : सांगलीतील दोन चोरांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धुमाकूळ घातला आहे. कानपूरमध्ये या चोरांनी कोट्यवधीचं सोनं पळवलं आहे. कानपूरच्या गलाई व्यावसायिकांचे 16 कोटींचे सोने घेऊन या चोरांनी पोबारा केला आहे. दोघेही मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. सोनं नेत असतानाचा त्यांचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. कानपूर पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी या दोघा संशयिताच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरू केली आहे.

सांगलीतील हे दोन्ही रहिवाशी कानपूरमध्ये गलाई व्यवसायानिमित्ताने गेले होते. मात्र तिथे गेल्यावर या दोघांनी गलाई व्यावसायिकाचे तब्बल 16 करोड रुपयांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. संपत शिवाजी लवटे आणि महेश विलास मस्के असे या संशितांची नावे असून पोलिसांनी त्यांचे फोटोही जारी केले आहेत. तसेच त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले

संपत हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बामणी गावचा आणि महेश हा पलूस तालुक्यातील नागराळे गावचा रहिवासी आहे. सांगली पोलिसांच्या मदतीने सोने घेऊन पळालेल्या दोघांचा शोध घेतला जात असून अद्याप तरी दोघांचा थांगपत्ता लागलेला नाही. कानपूर पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहे. त्यामुळे सध्या या दोघा संशयिताच्या कुटूंबातील सदस्यांची कानपूर पोलिस आणि स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. सोने घेऊन जात असतानाचे त्यांचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

कानपूरमध्ये यंत्रणा तैनात

कानपूर पोलिसांनी याबाबत तातडीने तपास यंत्रणा लावली असून सांगली जिल्ह्यात पोलिसांनी तळ ठोकला आहे. विट्यातही याबाबतचा तपास सुरु आहे. चोरी करणारे संशयित आरोपी फरार असल्याने कानपूर पोलिसांनी सांगली जिल्ह्यात आपली यंत्रणा कामाला लावली आहे.

नेपाळला पळून जाण्याची शक्यता

या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी एसआयटीची एक टीम स्थापन केली आहे. तसेच डीसीपी सेंट्रलच्या सर्व्हिलान्स टीमच्या 11 सदस्यांची टीम स्थापन केली होती. संपत आणि महेश या दोघांचेही पासपोर्ट तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे ते परदेशात पळून जाण्याची शक्यता फार कमी असल्याचं पोलिसांनी व्यक्त केली. मात्र, हे दोघे नेपाळला पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेपाळच्या सीमावर्ती भागात आणि आसपासच्या जिल्ह्यात दोन्ही कारागिरांची माहिती देण्यात आली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.