तो लग्नात आला अन् वधूच्या भेटवस्तू घेऊन पसार झाला, घटना सीसीटीव्हीत कैद

एका लॉनमध्ये लग्न समारंभ सुरु होता. सर्व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. पण लग्नात पाहुणा बनून आला आणि चोरटा साफ केला.

तो लग्नात आला अन् वधूच्या भेटवस्तू घेऊन पसार झाला, घटना सीसीटीव्हीत कैद
लग्नसमारंभात पैसे आणि दागिन्यांची चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 4:36 PM

नागपूर / सुनील ढगे : लग्न समारंभात पाहुणा बनून आलेल्या चोरट्याने वधूची पैशाची पाकिटे आणि दागिने घेऊन पोबारा केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. एका लॉनमध्ये लग्न समारंभात चोरट्याने पॉकिटात मिळालेल्या भेटवस्तू, पैसे आणि दागिन्यांवर हात साफ केला. एकूण 5 लाख 50 हजाराची चोरी झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

वधूचे दागिने आणि गिफ्ट गायब

नागपूरच्या नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील वसंत खडतकर राहणार भिलगांव यांच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्न समारंभात आलेल्या पाहुण्यांकडून वधुला मिळालेल्या पाकिटातील रक्कम आणि दागिने वधू बसलेल्या बाजूच्या जागेवर ठेवले होते. यावेळी कुटुंबातील सदस्य पाहुण्यांशी बोलण्यात व्यस्त असताना चोरट्यांनी संधी साधली. अनोळखी चोरट्यांनी पैसे आणि दागिने घेऊन पोबारा केला.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

काही वेळात ही गोष्ट लक्षात येताच मिळालेल्या भेट वस्तूंची कुटुंबातील नागरिकांनी शोधाशोध आणि विचारपूस केली. साहित्य कुठेही मिळून न आल्याने लग्नंसमारंभात एकच खळबळ उडाली. लॉनमधील सीसीटीव्ही चेक केले असता त्यात एक चोरटा ते साहित्य घेऊन जाताना दिसल्याने नवीन कामठी पोलिसात तक्रार देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

चोरट्याने जवळपास 5 लाख 50 हजार रुपयांचा मालावर हात साफ केल्याची माहिती कुटुंबातील नागरिकांनी पोलिसांना दिली. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.