अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले, वाटेत ट्रकची मागून धडक, कारमध्ये लहान बाळ होतं, त्याचं काय झालं?

Solapur - Akkalhkot Highway Accident : देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका कारला ट्रकनं धडक दिली असल्याची घटना सोलापूर अक्कलकोट मार्गावर घडली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या कारला ट्रकने मागून धडक दिली.

अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले, वाटेत ट्रकची मागून धडक, कारमध्ये लहान बाळ होतं, त्याचं काय झालं?
कारला धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त झालेला ट्रक
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 11:00 AM

सोलापूर : राज्यात अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे. सोमवार, मंगळवार नंतर आता बुधवारीही अपघाताची (Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका कारला ट्रकनं धडक दिली असल्याची घटना सोलापूर अक्कलकोट मार्गावर (Solapur-Akkalkot Highway) घडली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या कारला ट्रकने मागून धडक दिली. कार चालकानं अचानक ब्रेक (Sudden Break) लावला. त्यामुळे ट्रक चालकाला ट्रक कंट्रोल. ट्रकवरील नियंत्रण सुटलेल्या चालकानं कारला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. यामध्ये ट्रक चालकाच्या पायाला जबर मार लागला असून यावेळी कारमध्ये एक लहान बाळ आणि त्याचे आई वडीलही सोबत होते. या अपघातानंतर कारमध्ये असलेल्या लहान बाळासाह त्याचे आईवडील काही काळ गाडीतच अडकले होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर वळसंग पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. अक्कलकोटसाठी देवदर्शनाला कारने निघालेल्या कुटुंबीयांवर वाटेतच मोठं संकठ उभं ठाकलं होतं. मात्र सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नेमका कुठे झाला अपघात?

प्रजासत्ताक दिनाच्या सकाळीच हा अपघात झाला. सोलापूर अक्कलकोट रोडवरील कुंभारी नाक्याजवळ दोन ट्रक आणि कारमध्ये सकाळी सहा वाजण्याच्या सुमारात हा विचित्र अपघात झालाय. अक्कलकोटकडे जाणाऱ्या अर्टिगा कार चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे पाठीमागून येणारा एक ट्रक कारवर आदळला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

सुदैवानं या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. तर कारमधील लहान बाळ आणि त्याचे आईवडील काही काळ गाडीत अडकले होते. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी तत्काळ यंत्रणेला कामाला लावत जखमींना बाहेर काढून सोलापूरला खासगी रुग्णालयात दाखल केले.

अपघातांची मालिका

सोमवारपासून राज्यात अपघातांची मालिका सुरुच आहेत. पुणे-नगर महामार्गावर झालेल्या अपघातानंतर परभणीतही भीषण अपघात झाला होता. पुणे-नगर महामार्गावीरल अपघातात पाच जणांचा तर परभणीतील अपघातात तिघा भावंडांचा मृत्यू झाला होता. तर मंगळवारी सकाळी वर्ध्यात मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात कारमधील सातही विद्यार्थी ठार झाले होते. यानंतर मुंबई-पुणे जुन्या महामार्गासह, पुणे-नाशिक मार्गावरही अपघाताच्या घटना समोर आल्या होत्या. राज्यातील वाढत्या रस्ते अपघाताच्या घटनांनी सध्या चिंता वाढवली आहे.

संबंधित बातम्या :

Accident | 48 तासांत रस्ते अपघातात तब्बल 16 मृत्यू, वर्ध्यापाठोपाठ मुंबई-पुणे जुन्या हायेववरही अपघात!

कार थेट तब्बल 40 फूट खोल कोसळली, गाडीतलं कुणीच वाचलं नाही, सातही जणांचा जागीच मृत्यू!

बर्थडे सेलिब्रेट करायला गेले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! वर्ध्यातील अपघाताचा अंगावर काटा आणणार घटनाक्रम

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.