Video | औरंगाबादेत मद्यधुंद तरुणांची अरेरावी, शिवीगाळ करत पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मद्यधुंद तरुणांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे औरंगाबादेत खळबळ उडाली असून या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
औरंगाबाद : मद्यधुंद तरुणांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे औरंगाबादेत खळबळ उडाली असून या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री वसंतराव नाईक चौकात हा प्रकार घडला असून प्रताप पोपटराव जगताप, आकाश सुनिक कुलकर्णी, आशुतोष नवनाथ झिंझोडे अशी मारहाण करणाऱ्या तरुणांची नावं आहेत. या तिन्ही तरुणांना अटक करण्यात आलं आहे. (Three drunk young man arrested who beat Police in Aurangabad video went viral on social media)
मद्यधुंद तरुणांनी चेहऱ्याला मास्क लावलेले नव्हते
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील वसंतराव नाईक चौकात नाकाबंदी असल्यामुळे येथे काही पोलीस कर्त्यव्यावर होते. यावेळी दारूच्या नशेत तीन तरुण दुचाकी घेऊन जात होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्याला मास्क नव्हते. मास्क नसल्यामुळे पोलिसांनी या तरुणांना थांबवले.
तरुणांची पोलिसांना मारहाण, अर्वाच्य बाषेत शिवीगाळ
मात्र, आम्हाला का थांबवले ? असा सवाल करत मद्यधुंद तरुणांनी पोलिसांना मारहाण करणे सुरु केले. तरुणांनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. प्रताप पोपटराव जगताप, आकाश सुनिक कुलकर्णी, आशुतोष नवनाथ झिंझोडे असे पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी केलं तिन्ही तरुणांना अटक
दरम्यान, हा प्रकार घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सिडको पोलिसांनी कडक पवित्रा घेत या तिन्ही तरुणांना अटक केली. गुरुवारी मध्यरात्री वसंतराव नाईक चौकात हा प्रकार घडला.
पाहा व्हीडीओ :
इतर बातम्या :
एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईत 2 ड्रग पेडलर्सना अटक, कारवाईदरम्यान, 2 अधिकारी किरकोळ जखमी
नांदायला नकार देणाऱ्या पत्नीचे लांबसडक केस पतीने कापले, पिंपरीमध्ये विकृतीचा कळस
(Three drunk young man arrested who beat Police in Aurangabad video went viral on social media)
राज ठाकरेंसोबत युती करायला भाजपा बिचकतेय का? उत्तर भारतीय मतांचा फटका बसणार? वाचा सविस्तर https://t.co/r6ZqB2mU9g @RajThackeray @mnsadhikrut @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @OfficeofUT #RajThackeray #ChandrakantPatil #DevendraFadnavis #MNS #BJP #alliances #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2021