नवीन घराचे शिफ्टींग सुरु होते, अचानक सातव्या मजल्याच्या हॉलचा सज्जा कोसळला अन्…

सज्जा कोसळला तेव्हा सहाव्या मजल्यावरील हेतल दत्तानी ही महिलाही हॉलमध्ये असल्याने तिच्या सज्जा कोसळल्याने ती देखील यात जखमी झाली. तिघा जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नवीन घराचे शिफ्टींग सुरु होते, अचानक सातव्या मजल्याच्या हॉलचा सज्जा कोसळला अन्...
कांदिवलीत हॉलचा सज्जा कोसळून तीन जखमीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 11:17 PM

मुंबई / गोविंद ठाकूर : इमारतीच्या सातव्या मजल्याच्या हॉलचा सज्जा कोसळून तीन जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना कांदिवलीत घडली आहे. हॉलचा सज्जा कोसळल्यानंतर सातव्या मजल्यावरील दोन जण थेट सहाव्या मजल्यावर कोसळले. यात सहाव्या मजल्यावरील एक महिलाही जखमी झाली. कांदिवली पश्चिम न्यू पार्क अव्हेन्यू इमारतीत ही दुर्घटना घडली. जखमींमध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुंजन शाह, पिंकल दरू आणि हेतल दत्तानी अशी अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

सामान शिफ्टींग सुरु असतानाच हॉलचा सज्जा कोसळला

कुंजन शाह यांनी कांदिवली पश्चिमेतील न्यू पार्क अव्हेन्यू इमारतीतील सातव्या मजल्यावर फ्लॅट खरेदी केला आहे. कालपासून नवीन घरात शिफ्टींगचे काम सुरु आहे. आज घरी सामान शिफ्ट करत असतानाच सायंकाळी शाह यांच्या फ्लॅटमधील हॉलचा सज्जा कोसळला. यावेळी हॉलमध्ये सामान शिफ्ट करत असलेले कुंजन शाह आणि त्यांची मेव्हणी पिंकल दरु हे दोघे थेट सहाव्या मजल्यावरील हॉलमध्ये कोसळले.

सज्जा कोसळल्याने तीन जण जखमी

सज्जा कोसळला तेव्हा सहाव्या मजल्यावरील हेतल दत्तानी ही महिलाही हॉलमध्ये असल्याने तिच्या सज्जा कोसळल्याने ती देखील यात जखमी झाली. तिघा जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिघांवरही उपचार सुरु असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

अपघात प्रकरणी तपास सुरु

याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. इमारतीचा सज्जा नेमका कशामुळे कोसळला याबाबत पालिका, कांदिवली पोलीस आणि अग्नीशमन दल तपास करत आहे. तपासाअंतीच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.