रस्ता क्रॉस करताना भरधाव ट्रकने फरफटत नेले, बाईकवरील तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटी जवळील एशियन पेट्रोल पंप येथे सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरने एका बाईकला 100 मीटरपर्यंत फरपटत नेलं.

रस्ता क्रॉस करताना भरधाव ट्रकने फरफटत नेले, बाईकवरील तिघांचा जागीच मृत्यू
ट्रक आणि बाईक अपघातात तिघांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 11:33 AM

पालघर / जितेंद्र पाटील (प्रतिनिधी) : रस्ता ओलांडताना ट्रकने धडक दिल्याने बाईकवरील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबई अहमदाबाद महामार्गावर घडली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी एशियन पेट्रोल येथे हा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉसिंग करत असताना भरधाव ट्रकने 100 मीटरपर्यंत फरफटत नेले. या बाईकवर स्वार असणाऱ्या तिघांचा ट्रकच्या खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले. अपघातानंतर स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच येत्या काळात प्रशासना विरोधात आक्रमक होऊन रास्ता रोको करण्याचा इशारा देखील स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

एशियन पेट्रोल पंपाजवळ अपघात

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटी जवळील एशियन पेट्रोल पंप येथे सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरने एका बाईकला 100 मीटरपर्यंत फरपटत नेलं. यात बाईकवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातांची मालिका सुरुच

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्र म्हणजेच ब्लॅक स्पॉट कमी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने महामार्ग प्राधिकरणला दिले होते. मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवरील चारोटी पेट्रोल पंप येथील ब्लॅक स्पॉट न बुजवल्याने येथे अपघातांची मालिका सुरूच आहे.

हे सुद्धा वाचा

महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे अपघात

महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे या महामार्गावर आणखी तीन बळी गेले असून, मृत झालेले तिन्ही बाईक्सस्वार हे तलासरीतील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याच राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी सर्विस रोडचं काम सुद्धा अपूर्ण अवस्थेत आहे.

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.