कल्याण-डोंबिवलीत एका आठवड्यात तीन महिलांची हत्या, शहर हादरलं
कल्याण डोंबिवलीत गुन्ह्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे (Three Women Killed In One Week).
कल्याण : कल्याण डोंबिवलीत गुन्ह्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे (Three Women Killed In One Week). शहरात एका आठवड्यात तीन महिलांची हत्या झाल्याने शहर हादरले आहे. हत्येची ताजी घटना डोंबिवली लोढा हेवन येथील आहे. जिथे रेशनिंग दुकानात झालेल्या महिलेच्या हत्या प्रकरणात दुकानातील कामगाराला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्या का केली गेली हे अद्याप स्पष्ट नाही. तर दुसरी हत्या ही दोन दिवसांपूर्वीची आहे. कल्याणमध्ये एका 79 वर्षांच्या महिलेची हत्या करण्यात आली होती. तर तिसऱ्या घटनेत सात दिवसांपूर्वी एका महिलेची हत्या करण्यात आली होती (Three Women Killed In One Week).
पहिली घटना
डोंबिवली पूर्व भागातील लोढा हेवन परिसरात राजेश गुप्ता हा व्यक्ती रेशनिंग दुकान चालवितो. रविवारी रात्री राजेश पत्नी श्वेता आणि दुकानातील कामगार गुडी कुमार सिंग दुकानात होते. काही वाद झाल्यानंतर पती राजेश हा काही वेळेसाठी बाहेर निघून गेला. नंतर कामगाराने राजेशला सांगितले की, तुमच्या पत्नीने स्वत:ला जखमी करुन घेतले आहे. राजेश आला तेव्हा श्वेता ही मृत होती. तिच्या गळ्यावर आणि पोटावर वार होते.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक हरीदादा चौरे, डोंबिवलीचे एसीपी जे. डी. मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानाची पाहणी केली. या प्रकरणी दुकानातील कामगार गुडीकुमार सिंग यांच्यावर संशय आहे. त्यानेच श्वेताची हत्या केली आहे. मात्र, हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असल्याचे कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यानी सांगितले आहे.
दुसरी घटना
दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील दत्तआळी परिसरात एका 79 वर्षीय हशूताबेन प्रवीण ठक्कर या वयोवृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास बाजारपेठ पोलीस करीत आहे.
तिसरी घटना
7 दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात लुटीच्या इराद्याने सुवर्णा जगदीश घोडे या महिलेची परिसरातच राहणाऱ्या पवन म्हात्रे या तरुणाने हत्या केली होता. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
Ayesha Khan Suicide | ‘दुआओं में याद रखना’, नवऱ्याला व्हिडीओ पाठवला, नदीत उडी घेत विवाहितेची आत्महत्याhttps://t.co/fcUjy5orAm#ayeshaarifkhan #Ayesha #Ahmedabad #Rajsthan #Suicide
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
Three Women Killed In One Week
संबंधित बातम्या :
संपत्तीच्या वादातून काकाने जाळली जिनिंग फॅक्टरी, पुतण्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न
नालासोपाऱ्यात पहाटे कामावर जाणाऱ्या व्यक्तीचा निर्घृण खून, लुटीचा संशय
रेशनिंग दुकानदाराच्या पत्नीची दुकानातच हत्या, डोंबिवलीत खळबळ