पोलीस भरतीसाठी सराव करत होते तरुण, अचानक भरधाव वाहन आलं अन् पोलीस भरतीचं स्वप्न अधुरच राहिलं !

पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून तरुण प्रयत्न करत होते. यासाठी ते नियमित व्यायामाला जायचे. नेहमीप्रमाणे ते आजही व्यायामासाठी गेले, मात्र हा त्यांचा शेवटचा व्यायाम ठरला.

पोलीस भरतीसाठी सराव करत होते तरुण, अचानक भरधाव वाहन आलं अन् पोलीस भरतीचं स्वप्न अधुरच राहिलं !
व्यायाम करणाऱ्या तरुणांना भरधाव वाहनाने चिरडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 3:55 PM

अहमदनगर : कर्जत राशीन रोडवर अज्ञात वाहनाच्या धडके दोन युवकांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. व्यायाम करत असलेल्या तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडले. हे तरुण पोलीस भरतीसाठी सराव करत होते. कर्जत तालुक्यातील बेलवाडी येथील तरुणांवर काळाने घाला घातला. ओम प्रकाश धुमाळ आणि संतोष गदादे अशी अपघातात मयत तरुणांचं नाव असून, तर केदार गदादे असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. केदारवर कर्जतच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर बेनवडी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी कर्जत राशीन रोडवर रास्ता रोको केला.

काय घडले नक्की?

कर्जत-राशीन महामार्गावर ही भीषण घटना घडली. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बेनवडी फाट्याजवळच्या बुवासाहेब नगर येथे तिघे तरुणा रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. यावेळी अनियंत्रित अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले. या अपघातात ओम प्रकाश धुमाळ आणि संतोष गदादे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर केदार गदादे हा तरुणा गंभीर जखमी झाला. अपघातातील सर्व तरुण बेनवडी येथील रहिवासी आहेत.

पोलीस भरतासाठी सराव करत होते तरुण

जखमी तरुणाला मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कर्जतला नेण्यात आले. मयत तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी राशीन येथील शेखर जाधव यांच्या रुग्णवाहिकेतून कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. सर्व युवक हे पोलीस भरतीसाठी सराव करत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. मात्र या घटनेमुळे त्यांचं पोलीस भरतीचं स्वप्न कायमचं अधुरच राहिलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.