AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV : डिवायडरवर धडकली कार, चालक हवेत उडाला; अपघाताची थरारर दृश्य पाहून काळजाचा थरकाप उडेल

अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीतील एका टोलनाक्यावर मंगळवारी ही अपघाताची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

CCTV : डिवायडरवर धडकली कार, चालक हवेत उडाला; अपघाताची थरारर दृश्य पाहून काळजाचा थरकाप उडेल
भरधाव कार डिवायडरवर धडकलीImage Credit source: Twitter
| Updated on: Oct 20, 2022 | 8:40 PM
Share

नवी दिल्ली : एका टोलनाक्यावर एक अपघाताची थरारक घटना (Thrilling incident of an accident) सध्या उघडकीस आली आहे. भरधाव कार टोलनाक्यावरील (Toll Plaza) डिवायरवर जोरदार आदळली. धडक इतकी जोरदार होती की, यात कारच्या काचा फुटून चालक बाहेर फेकला गेला. चालक काही फूट हवेत उडून जमिनीवर आदळला. ही घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्हीत कैद (Incident caught in CCTV) झाली आहे. अपघाताचा थरार पाहून काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना नेमकी कुठल्या ठिकाणची आहे हे अद्याप कळू शकले नाही. मात्र एका टोलनाक्यावर ही अपघाताची घटना घडल्याचे व्हिडिओतून कळते.

सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. कारचालक जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, टोल बुथच्या दिशेने एक कार भरधाव वेगाने आली. गाडीचा वेग अधिक असल्याने गाडी अनियंत्रित झाली आणि टोलनाक्यावरील डिवायडरवर जोरात धडकली. या धडकेत कारच्या बोनेटचा चक्काचूर झाला.

कारच्या बोनेटचा चक्काचूर

कारच्या पुढच्या काचा फुटल्या आणि कार चालक पतंगासारखा हवेत उडाला आणि जमिनीवर आदळला. यानंतर कारने पेट घेतला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कार चालक जखमी झाला आहे.

सोशल मीडियावर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया

अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युजर्सने कारचालकाला चांगलेच फटकारले आहे. कार चालवताना वाहतुकीचे नियम पाळायला हवे होते, असे युजर्सने म्हटले आहे.

त्याचबरोबर सोशल मीडियावर यूजर्स व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देताना दिसत आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला फटकारले की, त्याने रस्त्यावर कार चालवताना वाहतुकीचे नियम पाळायला हवे होते.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.