Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola Crime : फ्लॅटमधून अचानक दुर्गंधी येऊ लागली, शेजाऱ्यांनी जावून पाहिले तर पायाखालची जमीनच सरकली !

दोन दिवस कुणाच्या संपर्कात नव्हती, दोन दिवस ड्युटीही जॉईन केली नाही. अखेर दोन दिवसांनी जे समोर आलं त्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

Akola Crime : फ्लॅटमधून अचानक दुर्गंधी येऊ लागली, शेजाऱ्यांनी जावून पाहिले तर पायाखालची जमीनच सरकली !
अकोल्यात एकटेपणाला कंटाळून महिला पोलिसाने जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 4:55 PM

अकोला / 16 ऑगस्ट 2023 : अकोल्यात एका घटनेने खळबळ उडाली आहे. एका महिला पोलिसाचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. एकटेपणाला कंटाळून महिलेने जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. वृषाली सरगे असे मयत महिला पोलिसाचे नाव आहे. मयत महिला अकोला शहरातल्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तीन वर्षापासून कार्यरत होती. दोन दिवसापासून महिला कुणाच्याही संपर्कात नव्हती. अखेर आज सकाळी घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या पतीचे आधीच निधन झाले होते. त्यांना काही मूलबाळही नव्हते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

काय आहे प्रकरण?

वृषाली सरगे यांचे पती पोलीस दलात नोकरी करत होते. पतीचे अचानक निधन झाल्यानंतर पतीच्या जागी वृषाली यांना नोकरी मिळाली. गेल्या तीन वर्षापासून त्या अकोला शहरात कार्यरत आहेत. त्यांना मूलबाळही नव्हते. तसेच नातेवाईकही फारसे संपर्कात नव्हते. त्यामुळे वृषाली या एकट्या पडल्या होत्या. एकटेपणाला कंटाळून अखेर त्यांनी गीता नगरमधील बेला विस्ता अपार्टमेंटमधील राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले.

मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून महिलेने एकटेपणाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. तसेच आपला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता जिल्हा सामान्य रुग्णालयाला देण्यात यावा असेही म्हटलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जुने शहर पोलीस करत आहेत.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.