AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस भरतीचं आमिष दाखवत तोतया पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार आणि फसवणूक

इन्स्टाग्रामद्वारे एका महिलेशी ओळख करुन तिला पोलीस भरती आणि लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार घडलाय.

पोलीस भरतीचं आमिष दाखवत तोतया पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार आणि फसवणूक
| Updated on: Mar 05, 2021 | 1:02 PM
Share

शिर्डी : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिर्डीमध्येही महिला अत्याचाराची एक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामद्वारे एका महिलेशी ओळख करुन तिला पोलीस भरती आणि लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार घडलाय. आरोपीने आपण पोलीस असल्याचं सांगत या महिलेसोबत पोलीस भरतीचं आमिष दाखवलं. तिच्याशी शारीरिक संबंध जोडले. तसंच लग्नाचं आमिष दाखवलं आणि मारहाण केल्याची तक्रार पीडित महिलेकडून करण्यात आली आहे. या महिलेच्या तक्रारीवरुन राहता पोलिस ठाण्यात तोतया पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Torture and cheating on a married woman pretending to be a policeman)

सोशल मीडियाद्वारे मैत्री

बीडच्या हिवराफाडी इथल्या किरण महादेव शिंदे याने शिर्डी इथल्या महिलेशी सोशल मीडियाद्वारे ओळख करुन मैत्री वाढवली. तसंच आपण पोलीस असल्याचं बनावट आयकार्ड आणि फोटो पीडित महिलेला दाखवले. आपण शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीला असल्याचं भासवून पीडितेशी घसट वाढवली. तुला पोलीस भरतीमध्ये मदत करतो. तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे, माझ्याशी लग्न करत, तुला सुखी ठेवेन असं सांगत संबंधित महिलेशी शारीरिक संबंध ठेवले.

सापळा रचून आरोपीला अटक

काही काळानंतर पीडित महिलेला तो व्यक्ती हा तोतया पोलीस असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने जाब विचारला असता आरोपीने महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पीडित महिलेल्या याबाबत राहता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्यावेळी तसापादरम्यान आरोपीकडे बनावट पोलीस आयकार्ड, पोलिसाचा ड्रेस आणि काही फोटो सापडले. या प्रकरणी आरोपी किरण शिंदेविरोधात भारतीय दंड विधान कलम 376, 419, 420, 170, 171 आणि 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

सहकारी महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवणं महागात, रंगेल प्राध्यापकाला पाच वर्षांचा कारावास

बंदुकीच्या धाकाने बलात्कार, विवाहितेची आत्महत्या, दोन सुसाईड नोट्सवरुन पोलिसालाच बेड्या

Torture and cheating on a married woman pretending to be a policeman

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.