“बाप म्हणतात तुळजापूरचा” मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणात आदेशाला स्थगिती, देवानंद रोचकरी समर्थकांचा जल्लोष

मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांच्या आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचा आणि वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला आहे. तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी, अशी मागणी रोचकरी यांनी केली आहे.

बाप म्हणतात तुळजापूरचा मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणात आदेशाला स्थगिती, देवानंद रोचकरी समर्थकांचा जल्लोष
देवानंद रोचकरी
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 11:56 AM

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन महात्म्य असलेला मंकावती तीर्थकुंड हडप केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेल्या आदेशाला नगर विकास मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. तुळजापूर येथील भाजप नेते देवानंद साहेबराव रोचकरी यांनी या प्रकरणात मंत्र्यांकडे अपील करताना, आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आणि म्हणणे ऐकून न घेता निकाल दिल्याचे म्हटले होते. त्यावरुन ही स्थगिती देण्यात आली आहे. नगर विकास मंत्र्यांकडे या प्रकरणी आता सुनावणी होणार आहे. या स्थगितीनंतर रोचकरी समर्थकांनी सोशल मीडियावर ‘बाप म्हणतात तुळजापूरचा’ असे पोस्ट करत आनंदोत्सव साजरा केला.

“तालुक्याचा 7/12 तुमच्या आईबापाच्या नावावर आहे का? मग कोणाच्या आईबापाच्या नावावर आहे, तेवढं सांगा म्हणजे 7/12 रिकामा करुन घेतो आम्ही” अशा आशयाचे फिल्मी डायलॉग देवानंद रोचकरी यांच्या फोटो-व्हिडीओसह त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले.

काय आहे प्रकरण?

मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांच्या आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचा आणि वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला आहे. तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी, अशी मागणी रोचकरी यांनी केली आहे. मंकावती कुंडावर अनेक ठिकाणी विनापरवाना अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसते. या प्रकरणी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

मंकावती कुंडाची महती

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण, तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. गरीबनाथ दशावतार मठाचे महंत सावजी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे जिल्हा संघटक अमर राजे कदम व इतरांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना 31 मे 21 रोजी लेखी तक्रार करून तुळजापूर शहरातील प्राचीन श्री विष्णू तीर्थ (सध्या मंकावती कुंड नावाने प्रचलित) बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती या समितीने केलेल्या अहवालांनंतर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते.

मंकावती तीर्थकुंडाची मालमत्ता ही नगर परिषद मालकीची कागदपत्रांची पाहणी व स्वतः जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन अहवाल दिला होता. तुळजापूर नगर परिषद यांनी 12 नोव्हेंबर 1982 रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र लिहून मंकावती कुंड तुळजापूर नगर परिषदेच्या स्थापनेपूर्वी तुळजापूर लोकल फंडकडे व्यवस्थापन होते. तत्कालीन हैद्राबाद संस्थान शासनाने मंकावती कुंड लोकल फंडास व्यवस्थापनासाठी सोपवले होते. त्यामुळे या कुंडाची मालकी नगर परिषदेची आहे. मंकावती कुंडाच्या बनावट कागदपत्रे आणि पुरावे तयार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच पुरातत्व संवर्धन कायदा 1904 मधील तरतुदीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असे आदेश होते मात्र याला स्थगिती दिली त्यामुळे आता या प्रकरणाकडे देवीभक्तांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या :

तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन मंकावती तिर्थकुंडच हडप केलं, स्थानिक भाजप नेत्याचा प्रताप

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.