‘माझ्यावर वारंवार बलात्कार’, अभिनेत्रीचा गंभीर आरोप, मुंबई पोलिसांकडे तक्रार

मुंबईत एका अभिनेत्रीवर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप झालाय.

'माझ्यावर वारंवार बलात्कार', अभिनेत्रीचा गंभीर आरोप, मुंबई पोलिसांकडे तक्रार
ही गोष्ट कोणाला समजली तर तुझे बॉक्सिंग करिअर खराब करेन, अशी धमकीही या प्रशिक्षकाने मुलीला दिली होती.
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 7:02 PM

मुंबई : बॉलीवूडच्या जगात वरवर जितका झगमगाट दिसतो तितकाच येथे अंधारही असल्याची अनेक प्रकरणं वारंवार समोर येतात. काम देण्याच्या बहाण्याने कास्टिंग काऊचपासून वेगवेगळ्या घटना समोर येतात. कधी काम देण्याच्या नावावर, तर कधी मैत्रीच्या नावावर बॉलीवूडचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींचं शोषण होत असल्याच्या अनेक घटना घडतात. आताही मुंबईत असंच एक प्रकरण समोर आलंय. एका अभिनेत्रीने तिच्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केलाय (TV actress allege rape on her complaint register in Mumbai).

टीव्ही अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अभिनेत्रीने आरोपीवर लग्नाचं आमिष देऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केलाय. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी FIR नोंदवत या प्रकरणाचा तपास सुरु केलाय.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये पीडित अभिनेत्रीने FIR दाखल केलीय. पीडित अभिनेत्रीने आरोपीवर लग्नाचं आमिष दाखवत फसवून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केलाय.” प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात गुन्हा नोंदवलाय. तसेच तपास सुरु केला.

‘बिहारमध्ये माझा बलात्कार आणि हत्या झाली असती’, अभिनेत्री अमिषा पटेलचा बिहारच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप

दरम्यान, याआधी अभिनेत्री अमिषा पटेलनेही धक्कादायक खुलासा केला होता. बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी गेला असताना माझा बलात्कार आणि हत्या झाली असती. मी मोठ्या मुश्किलीने त्या संकटातून सुटल्याचं अमिषाने सांगितलं होतं. अमिषाने चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रकाश चंद्रा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी जबरदस्तीने आपला प्रचार करण्यास सांगितले. तसेच न केल्यास धमकीही दिल्याचा आरोप अमिषाने केला होता (Actress Amish Patel allege LJP leader and supporter may rape and murder me in Bihar).

अमिषा म्हणाली होती, “मी एक पाहुणी म्हणून डॉ. प्रकाश चंद्रा यांच्याकडे गेली होती. मात्र, ते लोकांना ब्लॅकमेल करतात आणि धमकावतात. त्यांनी मला आणि माझ्या टीमला वाईट पद्धतीने धमकावलं आणि गैरवर्तन केलं. मी सायंकाळी मुंबईला परत आल्यानंतर देखील त्यांनी मला धमकी देणारे मेसेज आणि कॉल केले. तसेच माझ्याबद्दल चांगलं बोला आणि 26 ऑक्टोबरला जे घडलं त्याविषयी बोलू नका. त्यांनी मला ब्लॅकमेल करत पैसे देतो पण लोकांसमोर माझ्याविषयी चांगलं बोल असं सांगितलं.”

“मी बिहारमध्ये असल्याने शांत होते. मात्र, मला मुंबईला आल्यावर जगाला हे सत्य सांगायचं होतं. माझा बलात्कार आणि हत्या झाली असती. माझ्या गाडीभोवती पूर्ण वेळ त्यांच्या लोकांनी गराडा घातला होता. ते सांगतील ते सर्व करुपर्यंत मला चालून देखील दिलं जात नव्हतं,” असंही अमिषा म्हणाली होती.

हेही वाचा :

बंदुकीच्या धाकाने बलात्कार, विवाहितेची आत्महत्या, दोन सुसाईड नोट्सवरुन पोलिसालाच बेड्या

धक्कादायक! औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

मुंबईत पोलीस उपाधीक्षकावर बलात्काराचा गुन्हा, सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या आरोपाने खळबळ

व्हिडीओ पाहा :

TV actress allege rape on her complaint register in Mumbai

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.