Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | शरद मोहोळ गुंड की देशभक्त? भाजप आमदाराच्या वक्तव्याने खळबळ, पाहा व्हिडीओ
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याला भाजप आमदाराने दशभक्त म्हटलं आहे. भाजप आमदाराच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यावरील टीव्ही9 मराठीचा पाहा स्पेशल रिपोर्ट.
पुणे : शुक्रवारी कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात भरदिवसा हत्या करण्यात आली. दरम्यान यानंतर आता राजकीय वातावरण तापलंय. भाजपचे तेलंगणातील आमदार टी.राजा सिंग यांनी शरद मोहोळला देशभक्त घोषीत केलंय. पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. दरम्यान शरद मोहोळ हत्या प्रकरणावरुन आता राजकारण रंगताना दिसंतय. याचं कारण असं तेलंगणातील भाजप आमदार टी-राजा सिंग यांनी शरद मोहोळबद्दल केलेलं विधान शरद मोहोळ कट्टर हिंदू असल्यानं त्यांची हत्या केल्याचं टी-राजा सिंग यांनी म्हटलंय.
कुख्यात गुंड शरद मोहोळवर अनेक मोठे गुन्हे दाखल होते. अपहरण, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यांमध्ये तो जेलमध्ये होता. गुंड शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण शरद मोहोळणे केलं होतं. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं.
शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केलीय. यामध्ये दोन वकीलांचा देखील समावेश आहे. रवींद्र पवार आणि संजय उडान अशी या वकील आरोपींची नावं आहेत. शरद मोहोळच्या हत्येनंतर गुंडांचा बंदोबस्त करण्याचं काम सुरु असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.
पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु असल्यानं चौकशीत सविस्तर माहिती समोर येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. मात्र, दुसरीकडे भाजपचे तेलंगणातील आमदार टी-राजा सिंग शरद मोहोळचं गुणगाण गातांना दिसलेत. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शरद मोहोळला न्याय देण्याची मागणी स्वाती मोहोळनं देवेंद्र फडणवीसांकडे केलीय.