Pune : दोन कुटुंबाच्या भांडणात दोन मुक्या प्राण्याचा जीव गेला, मग पोलिस स्टेशनला गेल्यावर…
शेजारी पाजारी आणि घरात रोज भांडणं होत असतात. त्याचबरोबर मारहाण झाल्याचे सुध्दा अनेकदा पाहायला मिळतं, परंतु मुक्या प्राण्याचा जीव गेल्यामुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे – जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील वनगळी (vangali) येथे दोन कुटुंबांची भांडणं, त्यान दोन मुक्या प्राण्यांचा जीव (animal death)गेल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन्ही तक्रारदारांनी मुक्या प्राण्याचा जीव घेतल्याची एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी (indapur police) दोघांची तक्रार घेतली असून चौकशीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाल्यामुळे संपुर्ण इंदापूर तालुक्यात या घटनेची चर्चा सुरु आहे.
नेमकं काय झालं
दोन कुटुंबाच्या झालेल्या वादात जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा आणि पंढरपुरी मुरा म्हैस या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष बाब म्हणजे म्हैस आणि कुत्रा मारला बाबत इंदापूर पोलिस स्टेशन येथे परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकाने म्हैस मारली म्हणून तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्याने कुत्रा मारला म्हणून म्हैस मालकांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांच्या तक्रारी घेतल्या आहेत.



शेजारी पाजारी आणि घरात रोज भांडणं होत असतात. त्याचबरोबर मारहाण झाल्याचे सुध्दा अनेकदा पाहायला मिळतं, परंतु मुक्या प्राण्याचा जीव गेल्यामुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.