Car Accident : दोन कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, जळती कार पाहून अनेकांना घाम फुटला
कार भरधाव आल्यानंतर रस्त्यालगत पार्क केलेल्या इतर कारला धडकली. आगीचा भडका उडाला. यात संबधित कार व त्याठिकाणी असलेल्या इतर कार देखील आगीत सापडल्या अशी माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली आहे.
गोवा : गोवा (GOA) राज्यात पणजी (PANAJI) परिसरात पार्किंगमध्ये असलेल्या कारला दुसऱ्या कारने जोराची धडक दिली. त्यावेळी एका कारला (Car Accident) आग लागली आणि त्यामध्ये एका मृत्यू देखील झाल्याची माहिती मिळली आहे. विशेष म्हणजे एका व्यक्तीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला आहे. टोंका-पणजी येथे आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोंका-पणजी येथे भरधाव कारने रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली.
मुंबईचा तरुण अपघातामध्ये जळाला
या अपघातात कारला भीषण आग लागली. तसेच, जवळपास असणाऱ्या दुसऱ्या वाहनांना देखील आग लागली. यात कारमध्ये असलेल्या व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही कार महाराष्ट्रामधील असून त्यातील जळून मृत्युमुखी पडलेला इसम मुंबई येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही
मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघात झालेली महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात संबधित कार व इतर कारचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच, अपघातग्रस्त कारमधून मृत व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे.
रस्त्यालगत पार्क केलेल्या इतर कारला धडकली
कार भरधाव आल्यानंतर रस्त्यालगत पार्क केलेल्या इतर कारला धडकली. आगीचा भडका उडाला. यात संबधित कार व त्याठिकाणी असलेल्या इतर कार देखील आगीत सापडल्या अशी माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली आहे.