शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरला, सहकाऱ्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या शेतमजूराची घालमेल, पण त्याचाही जीव गेला

लातूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करत असताना पाणी आणण्यासाठी शेततळ्याजवळ गेलेल्या शेतमजुराचा मृत्यू झाला. तसेच त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या शेतमजुराचा देखील मृत्यू झाला.

शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरला, सहकाऱ्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या शेतमजूराची घालमेल, पण त्याचाही जीव गेला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 10:42 PM

लातूर : लातूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करत असताना पाणी आणण्यासाठी शेततळ्याजवळ गेलेल्या शेतमजुराचा मृत्यू झाला. तसेच त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या शेतमजुराचा देखील मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृतक शेतमजूर हे दोघं तरुण होते. त्यामुळे त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याशिवाय घरातील कर्त्या पुरुषांचं निधन झाल्याने गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही लातूर जिल्ह्यातल्या मुदगड-एकोजी इथे घडली. या भागात दोन शेतमजूळ पिकांवर तणनाशक फवारणीचे काम करत होते. या दरम्यान एक मजूर हा पाणी आणण्यासाठी शेततळ्याजवळ गेला. पण यावेळी विपरीत घटना घडली. पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला. त्यातून तो थेट पाण्यात पडला. त्याने जोरात किंचाळी मारली. यावेळी दुसरा शेतमजूर तिथे आला. त्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही पोहता येत नव्हते. यावेळी त्याच्या जीवाची प्रचंड घालमेल सुरु होती. त्याने मागचापुढचा विचार न करता तो शेततळ्यात त्याला वाचविण्यासाठी पुढे गेला. पण त्याचा उपयोग झाला नाही. उलट विपरीत दुर्घटना घडली. दुसरा शेतमजूरही शेततळ्यात पडला. दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. भैरव तोरंबे (वय 25), रणजित इंगळे (वय 40) अशी मृतक शेतमजुरांची नावे आहेत.

माशांना खाऊ टाकणाऱ्या विद्यार्थिनीचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दुसरीकडे नाशिकमधूनही अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. माशांना खाऊ टाकणारी विद्यार्थिनी पाय घसरून शेततळ्यात पडून मृत्यू पावल्याची घटना लासगाव तालुक्यातल्या आंबेवाडी येथे घडली आहे. उर्मिला बोराडे असे मृत मुलीचे नाव आहे. येवला तालुक्यातील विसापूर हद्दीतील आंबेवाडी येथे उर्मिला दत्तात्रय बोराडे ही विद्यार्थिनी आपल्या घरातील शेततळ्यात माशांना खाऊ टाकत होती. ती नेहमीच माशांना खावू टाकायची. मात्र, स्वतःच्या तंद्रीत असताना तिचा पाय अचानक घसरला. त्यामुळे ती शेततळ्यात पडली. यावेळी घरात किंवा तिच्याजवळ कोणीही नव्हते. त्यामुळे ती शेततळ्यात पडल्याचेही कुणाला समजले नाही. अखेर खूप शोधाशोध केली. तेव्हा तिचा मृतदेह शेततळ्यात सापडला.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात यापूर्वी दोन भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नाशिक जिल्ह्यातल्या एरंडगाव येथील संतोष पुंडलिक जगताप यांना हर्षल (वय 14) आणि सार्थक उर्फ शिवा (वय 12) ही मुले होती. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हर्षल आणि सार्थक उर्फ शिवा ही दोन्ही मुले शेतात गेली. जगताप यांच्या शेतात एक शेततळे आहे. या मुलांनी शेतात येताच आपला मोर्चा शेततळ्याकडे वळवला. सार्थक उर्फ शिवा हा कपडे काढून पोहण्यासाठी तळ्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो गटांगळ्या खावू लागला. हर्षलने हे पाहताच भावाकडे झेप घेतली. मात्र, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

हेही वाचा :

मुंबईत ‘सेक्स टुरिझम रॅकेट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; दोन महिला दलालांना अटक

सख्खा भाऊ पक्का वैरी, नेमकं असं काय घडलं ज्याने भावाने भावाला संपवलं? पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक घटना

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.