AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CRIME NEWS : लग्न आणि बारशाच्या कार्यक्रमासाठी आल्या, एकीचा पाण्यात पाय घसरला, सात जणींनी उड्या घेतल्या, मग…

नातेवाईकांच्याकडे लग्न आणि बारश्याच्या कार्यक्रमासाठी मुली आल्या होत्या. त्यापैकी एका मुलीचा पाण्यात पाय घसरला, तिथं ती बुडू लागल्यानंतर सात जणींनी उड्या घेतल्या.

CRIME NEWS : लग्न आणि बारशाच्या कार्यक्रमासाठी आल्या, एकीचा पाण्यात पाय घसरला, सात जणींनी उड्या घेतल्या, मग...
khadakwasla
| Updated on: May 16, 2023 | 10:41 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे सुट्टी अनेकजण जात असतात. त्याचवेळी तिथं अनेकदा कार्यक्रम असतात. बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील दोन मुली पुणे येथील खडकवासला धरणाच्या (khadakwasal damp) बॅक वॉटर असलेल्या नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या मुळ गावच्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. सध्या रोज पाण्यात मुलं बुडाल्याच्या घटना घडत आहेत. मागच्या आठदिवसात महाराष्ट्रात अनेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ज्या दोन मुली बुडाल्या त्या मामाकडे लग्न आणि बारश्याच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. ही घटना तात्काळ तिथल्या जवळच्या पोलिसांनी (pune police) सांगितली, त्याचबरोबर अग्नीशामक दलाला सुध्दा दिली.

शीतल आणि खुशीचा बुडून मृत्यू

बुलढाणा जिल्ह्याच्या दोन लेकींचा पुणे येथील खडकवासला धरणाच्या बॅक वॉटर असलेल्या नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे बुलढाणा परिसरात ही शोककळा पसरली. या घटनेत एकीचा पाय घसरल्याने तिला वाचवायला गेलेल्या ८ जणी बुडू लागल्या होत्या. त्यापैकी ७ मुलींना वाचवण्यात स्थानिकांना यश आल आहे. तर दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या मुलीचं नावं खुशी संजय खुर्दे (१३ वर्ष) राहणार बुलडाणा आणि शीतल भगवान टिटोरे , वय १८ वर्ष , राहनार झरी, अशी नावे आहेत.

दोघीही मृतक नात्याने आते मामे बहीण

या दोघीही मृतक नात्याने आते मामे बहीण लागतात. मृतक या त्यांच्या नातेवाईकाकडे लग्न आणि बारशाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या होत्या. बुलडाण्यावरून खडकवासला येथे गेलेल्या ९ मुली तसेच काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यापैकी एक मुलगी पाय घसरून पाण्यात पडली, तिला वाचवण्यासाठी आठ जणी धावल्या, त्याही बुडाल्या, यावेळी मुलीच्या किंकाळ्या एकूण परिसरातील लोक तिथे धावले. यावेळी ७ जणींना वाचवण्यात यश आले, मात्र दोघींना जलसमाधी मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा परिसरात शोककळा पसरली आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.