वाढदिवसाचा केक चेहऱ्यावर लावल्याने राडा, दोन गट आमने सामने भिडले !
दोन्ही गट आमने-सामने आले रस्त्यातच भिडले. यावेळी तेथे बघ्यांची गर्दी जमली होती. तेथे उपस्थित लोकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
हल्दानी : वाढदिवसाच्या पार्टीत चेहऱ्यावर केक लावल्याने दोन गटात तुफान हाणामारी केल्याची घटना उत्तराखंडमधील हल्दानीमध्ये घडली आहे. दोन गटातील फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कुणीही याप्रकरणी तक्रार न दिल्याने कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मुखानी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या उंचापूल परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
केक चेहऱ्यावर लावण्यावरुन वाद
उंचापूल परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये काही युवक वाढदिवस साजरा करत होते. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर चेहऱ्यावर केक लावण्यावरुन दोन गटात वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दोन्ही गट आमने-सामने आले रस्त्यातच भिडले. यावेळी तेथे बघ्यांची गर्दी जमली होती. तेथे उपस्थित लोकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
पोलिसांकडून नियमानुसार कारवाई सुरु
पोलिसांनी माहिती मिळताच वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र याबाबत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. हल्द्वानीचे सीओ भूपेंद्र सिंह धोनी यांनी याबाबत सांगितले की, पोलिस नियमानुसार कारवाई करत आहेत.
नुकतेच क्षुल्लक कारणातून तरुणावर गोळाबाराची घटना
नुकतेच येथे एका तरुणावर गोळ्या झाडल्याची घटना घडली. मित्रांमध्ये काही कारणातून वाद झाला. या वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या तोंडावर गोळ्या झाडल्या. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते.