VIDEO | दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट, भरधाव गाडीने भाविकांना उडवलं
मिरवणुकीतील सहभागींनी कार चालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं
भोपाळ : कार चालकाने गर्दीत भरधाव गाडी घुसवल्याने दुर्गा माता मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागलं. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शनिवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
मिरवणुकीतील सहभागींनी कार चालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. संतप्त भाविकांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आरोपी कार चालकाला लवकरच पकडलं जाईल, अशी हमी पोलिसांनी दिली.
नेमकं काय घडलं?
शनिवारी रात्री 11.15 वाजता भाविक दुर्गा माता मूर्ती विसर्जनासाठी बाजारिया पोलीस स्टेशन परिसरात निघाले होते. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक एकसमोरुन मिरवणूक जात असताना एक भरधाव कार मागच्या बाजूने मिरवणुकीत घुसली. तिने काही भक्तांना धडक दिली. त्यामुळे उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत कार मागे घेऊन चालकाने पळ काढला.
पाहा व्हिडीओ :
#WATCH Two people were injured after a car rammed into people during Durga idol immersion procession in Bhopal’s Bajaria police station area yesterday. Police said the car driver will be nabbed.#MadhyaPradesh pic.twitter.com/rEOBSbrkGW
— ANI (@ANI) October 17, 2021
दरम्यान, पोलिसांनी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, त्यामुळे नागरिकांनी बाजारिया पोलीस स्टेशन समोर चक्काजाम आंदोलन केलं.
मराठी अभिनेत्रीचा अपघात
दुसरीकडे, छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळेंचा अपघात झाला आहे. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. वर्षा दांदळे यांनी स्वत: त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांना एक भावनिक आवाहनही केले आहे.
अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या अपघाताची माहिती देत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मोठा अपघात. मणक्याला दुखापत झालीये. उजव्या पायालाही दुखापत झालीये, तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेची गरज आहे”.
वर्षा दांदळे नुकत्याच ‘पाहिले नं मी तुला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेत वर्षा दांदळेंनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. मालिकेत त्यांनी ‘वच्छी आत्या’चे पात्र साकारले होते.
संबंधित बातम्या :
अंबरनाथमध्ये भरधाव बसची दुचाकीस्वाराला धडक; अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी