Sangli Cheating : सांगलीत शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक, 47 लाखांची रोकड जप्त

शेतकऱ्यांची द्राक्षे विकून पैसे घेऊन आरोपी परागंदा झाले होते. आरोपींनी 14 हून अधिक शेतकऱ्यांना गंडा घातला होता. विटा पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळत रोख रक्कम हस्तगत केली आहे.

Sangli Cheating : सांगलीत शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक, 47 लाखांची रोकड जप्त
सांगलीत शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्यांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 6:55 PM

सांगली : खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना गंडा (Cheating) घालणाऱ्या व्यापाऱ्यांचा विटा पोलिसांनी भांडाफोड केला असून, त्यांच्याकडून तब्बल 47 लाखांची रोख (Cash) रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये सामील असणाऱ्या दोन आरोपींना पुणे व मुंबई येथून अटक (Arrest) करण्यात आली आहे. गणेश सुधाकर बारसकर आणि प्रवीण नारायण फटांगरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शेतकऱ्यांची द्राक्षे विकून पैसे घेऊन आरोपी परागंदा झाले होते. आरोपींनी 14 हून अधिक शेतकऱ्यांना गंडा घातला होता. विटा पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळत रोख रक्कम हस्तगत केली आहे.

दोन्ही आरोपी मुंबई आणि पुण्यातून अटक

विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे औंध येथील द्राक्ष एक्सपर्ट कंपनीचे चालक व मालक असल्याचे भासववून खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आरोपींनी गंडा घातला आहे. याबाबत चिखलहोळ येथील धनाजी शामराव यमगर यांनी विटा पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. यमगर यांच्यासह अन्य 14 शेतकऱ्यांना अहमदनगर जिल्ह्यातील गणेश सुधाकर बारसकर आणि प्रवीण नारायण फटांगरे यांनी शेतकऱ्यांकडून द्राक्षे खरेदी केली होती. ती द्राक्षे परस्पर विकून त्याचे पैसे शेतकऱ्यांना न देताच त्यांनी पलायन केले होते. याचा विटा पोलिसांनी कसोशीने तपास करुन या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून तब्बल 47 लाख 5 हजार 850 इतकी रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे. (Two traders who cheated farmers in Sangli were arrested by Vita police)

हे सुद्धा वाचा

धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.