Udupi Ambulance : ऍब्युलन्सची धडक इतकी भयंकर होती की पेशंटसह चौघे रस्त्यावर आदळले! जागीच ठार
Udupi Ambulance CCTV Video : गजानन नाईक, मंजुनाथ नाईक , लोकेश नाईक, ज्योती नाईक यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला.
रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा (Udupi Accident Video) भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रुग्ण तर ठार झालाच. पण त्याच्यासोबत इतर चौघांचाही जीव गेलाय. या भीषण अपघाताची काळजाचा थरकाप उडवणारी भयंकर दृश्य कॅमेऱ्यात (Accident CCTV Video) कैद झाली आहेत. एका टोल नाक्यावर ही घटना घडली. टोल नाक्यावर सुसाट वेगानं ही ऍम्बुलन्स (Udupi Ambulance Accident) येत होती. मात्र त्याधी टोलच्या गेटला वाहन धडकू नये म्हणून चालकानं ब्रेक लावला. पण निसरड्या रस्त्यावरुन ऍब्युलन्स स्किड झाली, त्यानंतर टोलच्या केबिनला जोरदार धडकली आणि अखेर रस्त्यावर पटली झाली. याच चौघांचा जागीच जीव गेला तर एक जण गंभीर जखमी झाला. एकूण आठ जण या रुग्णवाहिकेतून पेशंटला घेऊन जात होता. पुढील उपचारासाठी पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना अपघातात त्याच्यासह इतर तिघांवरही काळानं घाला घातलाय. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गजानन नाईक, मंजुनाथ नाईक , लोकेश नाईक, ज्योती नाईक यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. गजानन नाईक यांना दुसऱ्या रुग्णालयात या रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचा मागचा दरवाजा धडकेच उघडला गेला आणि त्यातून पेशंटसह चौघे थेट रस्त्यावर आदळले. यात त्यांना जबर मार बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. टोल नाक्यावर बसलेल्या जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. या अपघाताचे दोन कॅमेऱा कॅमेरा एन्गल आता समोर आले आहेत.
पाहा व्हिडीओ :
Speeding Ambulance crashes into the toll gate at Shiroor in Udupi district of Karnataka.
The ambulance was on its way to bring a patient from Honnavar to Kundapur, lost its control and collided with the toll booth. Three people have reportedly died in the accident. pic.twitter.com/hgVVjsG9EX
— Mangalore City (@MangaloreCity) July 20, 2022
बुधवारी (20 जुलै) हा अपघात जाला. उडुपी येथील रुग्णालयात गजनान नाईक यांना घेऊन जात होते. त्यावेळी शिरुर टोलगेट इथं हा अपघात घडला. शिरुर टोलगेच्या केबिनवरच ही रुग्णवाहिका जोरदार आदळली. भरधाव वेगानं आवाज करत येणारी ही रुग्णवाहिका थेट पास व्हावी, म्हणून टोलवर काम करणाऱ्या एका माणसानं बॅरिकेट्स दुसऱ्या बाजूला हटवले. पण तितक्यात ही रुग्णवाहिका स्किड झाली आणि टोलच्या कॅबिनला धडक देत थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उलटली.
या थरारक घटनेत चार जण ठार तर चार जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामध्ये टोल गेटचं तर नुकसान झालं. पण रुग्णवाहिकाही चक्काचूर झाली.
अपघातातील मृतांची नावं
- गजनान नाईक, वय 45
- मंजुनाथ नाईक, वय 40
- लोकेश नाईक, वय 42
- ज्योती नाईक, वय 32
गजानन नाईक यांनी होन्नावर येथून पुढील उपचारासाठी उडुपीच्या एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात येणार होतं. त्यासाठी गजानन यांच्यासोबत त्यांचे अन्य सहा नातलग या रुग्णवाहिकेतून निघाले होते. सोबत रुग्णवाहिकेचा चालकही होता. असे एकूण आठ जण या रुग्णवाहिकेत होते.