भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलीस स्टेशन बाहेरील CCTV फुटेज समोर

Ganpat Gaikwad CCTV Footage : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात मोठा ट्विट आला आहे. पोलीस स्टेशन बाहेर आपल्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आल्याचं गायकवाड यांनी म्हटलं होतं. मात्र अशातच पोलीस स्टेशन बाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलीस स्टेशन बाहेरील CCTV फुटेज समोर
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 5:02 PM

मुंबई : कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे. पोलीस चौकीमध्ये गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. शिंदे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. या गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशातच आता आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दिसत आहे की पोलीस चौकीबाहेर नेमकं काय घडलं होतं. धक्काबुक्की कोणी केली याचा खुलासा या व्हिडीओमधून झाला आहे.

हिल लाईन पोलीस स्थानकाच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि त्याचे सहकारीने धक्काबुक्की वाद घालत असल्याचं दिसत आहे. वैभव गायकवाड सह इतर सहकारी वाद घालत असून पोलीस मध्यस्थी करत असल्याचंही सीसीटीव्हीमध्ये कैद  झालं आहे. जेव्हा आमदार गणपत गायकवाड यांनी आतमध्ये गोळीबार केला तेव्हा महेश गायकवाड यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाला आमदार गायकवाड यांच्या भाच्याने खेचून मारहाण केल्याचंही सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यावर आपली प्रतिक्रिया देताना, माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमधून बाहेर जाताना धक्कबुक्की केली गेली. महेश गायकवाड याने पोलीस स्टेशन बाहेर चारशे जणांना जमा केलं होतं. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर मारत असतील तर मग मी काय करणार? माझं आत्मसंरक्षण करण्यासाठी मला हे करणं गरजेचं असल्याचं आमदार गायकवाड यांनी सांगितलं होतं.

गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

उल्हासनगर-हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदारांसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्या अडचणीच वाढ झाली आहे. गोळीबार प्रकरणी गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.