Crime News : उधारीचे पैसे देण्यास उशीर झाल्यानं आई आणि मुलाला बेदम मारहाण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेनंतर चाबुकस्वार कुटुंबीय दहशतीखाली असून पोलिसांनी तात्काळ आरोपी आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे यांना अटक करावी, अशी मागणी निखिल आणि त्याच्या आईने केली आहे.

Crime News : उधारीचे पैसे देण्यास उशीर झाल्यानं आई आणि मुलाला बेदम मारहाण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 9:18 AM

निनाद करमरकर, उल्हासनगर : उधारीचे पैसे देण्यास उशीर झाल्याने आई आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस (police) ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र फरार झाले आहेत. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आईला सुध्दा मारहाण करण्यात आल्याने परिसरात घबराहट (Ulhasnagar crime news) पसरली आहे. पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाल्यापासून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

मुलाचं नाव निखिल चाबुकस्वार आणि आईचं नाव मीना चाबुकस्वार असं आहे. निखिलने त्याच परिसरात राहणारे गणेश कांबळे आणि आकाश गायकवाड यांच्याकडून तीन हजार रुपये घेतले आहेत. ते पैसे देण्यास उशीर झाला म्हणून निखिलवरती चाकू आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला. निखिलला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या आईला देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

या मारहाणीत निखिल आणि मीना हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, निखिलचे वडील भाजी-पाला व्यवसाय करत असून ते हातगाडी लावण्यासाठी गेले असता, त्याठिकाणी सुद्धा आरोपी यांनी दबाव आणून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर चाबुकस्वार कुटुंबीय दहशतीखाली असून पोलिसांनी तात्काळ आरोपी आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे यांना अटक करावी, अशी मागणी निखिल आणि त्याच्या आईने केली आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.