Ulhasnagar Crime : उल्हासनगरमधील चोर ब्रँडेड गोष्टींचा शौकीन, आयफोन चोरीपासून ते शर्टपर्यंत, याचे कारनामे वाचाच
याच चोरट्यानं मोबाईल शॉप (Mobile Shop Robbery) फोडण्याच्या काही दिवस आधी एक कपड्याचं दुकान फोडून तिथून ब्रँडेड कपडे आणि शूज चोरल्याची माहिती आता समोर आलीये. याप्रकरणी त्याच्यावर चोरीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये आजकाल जणू चोरांचा (Ulhasnagar thief) सुळसुळाट उठला आहे. गेल्या काही दिवसात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण हे चांगलेच वाढले आहे. आता तर एक अशी चोरी आणि एक असा चोर समोर आलाय. जे वाचल्यावर तुम्हीही कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण चोराचे शौक अत्यंत महागडे आहे. हे महागडे शौकही तो या त्या दुकानात चोऱ्या करूनच पूर्ण करत आहे. त्यामुळे या गुन्ह्याची उलगड झाल्यावर पोलिसांनाही (Ulhasnagar Police) काळ जरा धक्काच बसला. उल्हासनगरात मोबाईल शॉप फोडून 18 लाखांचे ऍप्पल कंपनीचे फोन चोरणाऱ्या चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याच चोरट्यानं मोबाईल शॉप (Mobile Shop Robbery) फोडण्याच्या काही दिवस आधी एक कपड्याचं दुकान फोडून तिथून ब्रँडेड कपडे आणि शूज चोरल्याची माहिती आता समोर आलीये. याप्रकरणी त्याच्यावर चोरीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गुन्ह्याचा उलगडा कसा झाला?
उल्हासनगरच्या साउंड ऑफ म्युझिक दुकानात रविवारी 8 मे रोजी पहाटे एक चोरटा छत फोडून आत घुसला होता. त्याने दुकानातले 18 लाख 72 हजार रुपयांचे ऍप्पल कंपनीचे फोन चोरून नेले होते. याप्रकरणात पोलिसांनी चोरटा महमद फिरोज नईम अहमद याला काही तासातच बेड्या ठोकत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला होता. यानंतर त्याच्या चौकशीदरम्यान त्याने मोबाईल दुकानात चोरी करायच्या काही दिवस आधी एका कपड्याच्या दुकानात चोरी करून कपडे चोरल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील स्टेशन रोडवर असलेल्या ‘अक्की’ नावाच्या दुकानात या चोरट्याने मोठा हात मारल्याचं समोर आलं. आणि या चोराचा आणखी एक भंडाफोड झाला.
या दुकानातून काय काय चोरलं?
या दुकानातून त्यानं 22 ब्रँडेड टीशर्ट्स, 4 पॅन्ट, 3 हाफ पॅन्ट आणि ब्रँडेड शूज असा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यामुळं त्याच्याविरोधात आयपीसी 380, 454, 457 प्रमाणे चोरीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हा चोरटा मध्यवर्ती पोलिसांच्याच ताब्यात असून मोबाईल चोरी प्रकरणातले पोलीस कोठडी संपल्यावर त्याची कपडे चोरीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी घेतली जाईल, अशी माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. मात्र असा महागडे शौक असणारा चोर पाहून या परिसरातील दुकानदारही आवाक राहिले आहेत. आता या चोराला बेड्या ठोकल्याने परिसरातील दुकानदारांना मोठा दिलासा मिळाळा आहे.