Thane Crime : मुलाला स्कूलबसमध्ये बसवून घरी निघाली तेवढ्यात बाईकवरून आलेल्या दोघांनी…

सकाळी एक महिला मुलाला शाळेच्या बससाठी सोडण्यात आली होती. मात्र घरी परत जाताना तिच्यासोबत धक्कादायक घटना घडली. यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Thane Crime : मुलाला स्कूलबसमध्ये बसवून घरी निघाली तेवढ्यात बाईकवरून आलेल्या दोघांनी...
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 10:09 AM

उल्हासनगर | 13 ऑक्टोबर 2023 : शहरातील गुन्ह्यांचे (crime in city) प्रमाण वाढू लागले आहे. दिवस-रात्र काहीही असो, लूटमार, चोरी, दरोडा, पाकिटमारी असे विविध गुन्हे घडल्याच्या केसेस दररोज कानावर पडत असतात. यामुळे शहरातील नागरिक अतिशय धास्तावले असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. सोनसाखळी चोरांचा (thieves) उच्छादही प्रचंड वाढला असून अशीच एक धक्कादायक घटना शहरात सकाळी-सकाळी घडली आहे.

मुलाला शाळेच्या बसमध्ये बसवून घरी परतणाऱ्या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला. घराच्या दिशेने ही महिला निघाली असता, बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील चेन हिसकावली (gold chain theft) आणि क्षणात वायूवेगाने ते पसार झाले. त्या महिलेने त्यांना रोखण्याच प्रयत्न केला मात्र काहीच उपयोग झाला नाही.

दुचाकीवरून पळताना चोरटे सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगर कॅम्प नं-३, ओटी सेक्शन परिसरात ही घटना घडली. या परिसरात राहणारी मेहेक ही महिला मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता मुलाला स्कूलबस बसवण्यासाठी आली होती. त्याची बस गेल्यानंतर त्याही घराच्या दिशेने निघाल्या. मात्र त्याचवेळी त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातली अडीच तोळे वजनाची सोनसाखळी खेचली ते आणि फरार झाले. मात्र हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पीडित महिलेने मध्यवर्ती पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानतंप पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे या सोनसाखळी चोरांचा शोध सुरू केला आहे.

उल्हासनगरमधील अन्य बातम्या

एका इमारतीला लागली भीषण आग, 12 ते 13 दुचाकी जळून खाक

उल्हासनगर कॅम्प तीन पवई परिसरातील हरिदर्शन इमारतीत रात्री 12.30 च्या सुमारास पार्किंग मध्ये अचानक भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीमध्ये 12 ते 13 दुचाकी जळून खाक जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून इमारती मध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.