जमिनीच्या वाद चिमुरडीच्या जीवावर बेतला, सख्या काकाने 4 वर्षाच्या पुतणीला…

आईच्या नावावर असलेल्या सहा एकर शेतजमिनीच्या वाटण्या करण्यासाठी आरोपी यशोदीप हा सतत भाऊ यशोधनसोबत भांडत होता. याप्रकरणी गावातील लोकांनी बैठक घेतं त्याची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता.

जमिनीच्या वाद चिमुरडीच्या जीवावर बेतला, सख्या काकाने 4 वर्षाच्या पुतणीला...
सोलापूरमध्ये जमिनीच्या वादातून चिमुकलीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 3:45 PM

सोलापूर / सागर सुरवसे (प्रतिनिधी) : शेतजमिनीच्या वादातून भावाला अद्दल घडवण्यासाठी काकानेच आपल्या 4 वर्षाच्या पुतणीची हत्या करुन मृतदेह नदीत फेकल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये उघडकीस आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरी आरोपी काकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोदीप धावणे असे आरोपी काकाचे नाव आहे. पुतणीची हत्या केल्यानंतर आरोपी काका फरार झाला. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथे धावणे कुटुंबीय राहतात. आई-वडिल, दोन भाऊ, सून, नात असा धावणे परिवार आहे. धावणे यांची वडिलोपार्जित 16 एकर शेतजमीन आहे. यातील पाच एकर ही मोठा मुलगा यशोधन धावणे याच्या नावे, पाच एकर भाऊ यशोदीप यांच्या नावे तर उर्वरित सहा एकर ही आईच्या नावे आहे.

आईच्या नावावर असलेल्या सहा एकर शेतजमिनीच्या वाटण्या करण्यासाठी आरोपी यशोदीप हा सतत भाऊ यशोधनसोबत भांडत होता. याप्रकरणी गावातील लोकांनी बैठक घेतं त्याची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता. याच कारणातून काल सकाळी यशोदीप आणि यशोधन या दोन्ही भावात पुन्हा एकदा भांडण झाले.

हे सुद्धा वाचा

यावेळी आईच्या नावावर असलेल्या 6 एकर जमिनीची वाटणी न करण्यात तुम्ही पती-पत्नी जबाबदार असून, आज तुमचा फैसलाच करतो असे म्हणत यशोदीप याने यशोधनला शिवीगाळ केली. तसेच तुमचा वंश संपवतो अशी धमकीही दिली. गावातील लोकांनी मध्यस्ती करत दोघांना शांत केले. त्यानंतर यशोधन हे आई आणि पत्नीसह शेतावर निघून गेले.

घरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपीने मुलीची हत्या करुन नदीत फेकले

यशेदीप काही कामानिमित्त बाहेर गेला होता. घरी परतल्यानंतर घरात मुलगी ज्ञानदा आणि वडील शिवाजी हे दोघे दिसले नाहीत. त्याने वडील शिवाजी यांना फोन केला असता त्यांनी आपण मंदिरात दर्शनासाठी आल्याचे सांगितले. तसे 4 वर्षाची मुलगी घरात झोपली असल्याचेही सांगितले. याच संधीचा फायदा घेत आरोपी मुलीला घेऊन गेला.

मात्र शेतावरुन आई-वडिल घरी परतले तेव्हा मुलगी घरी दिसली नाही. त्यांनी आसपास चौकशी केली असता यशोदीप मुलीला घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. यशोधनने तात्काळ यशोदीपला फोन लावून मुलीबद्दल विचारले. यावेळी मी तुझ्या मुलीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिले असे यशोदीपने सांगितले.

मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हे ऐकल्यानंतर यशोधनने तात्काळ मालिकपेठ येथे धाव घेतली असता मुलगी पाण्यावर तरंगताना दिसून आली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीला पाण्यातून बाहेर काढत तात्काळ मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेतीच्या वाटणीच्या वादातून चार वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या करणाऱ्या काका विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.