टेडी बेअरप्रमाणे दोन महिन्यांच्या बहिणीला अंघोळ घालायला गेल्या, पण पुढे जे घडले ते…

दोन बहिणी घरात खेळत होत्या. आई स्वयंपाक करत होती, तर दोन महिन्यांची चिमुरडी बेडरुममध्ये होती. खेळता खेळता बहिणींच्या डोक्यात कल्पना आली आणि मग पुढे जे घडले ते भयंकर होते.

टेडी बेअरप्रमाणे दोन महिन्यांच्या बहिणीला अंघोळ घालायला गेल्या, पण पुढे जे घडले ते...
इंजेक्शन दिल्याने दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यूImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 11:17 AM

नर्मदापूर : मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील शोभापूर गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन महिन्यांची मुलगी घरातील बाथरूममध्ये बादलीत मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. मुलीचा मृतदेह बादलीत होता आणि बादलीवर झाकण होते. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली. मात्र तपासाअंती जे उघड झालं, त्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.

दोघा बहिणींची चौकशी केली असता सत्य उघड

प्रकरणाचा तपासादरम्यान पोलिसांनी संशयाच्या आधारे घराजवळील एका भिकाऱ्यालाही ताब्यात घेतले. तसेच मुलीच्या आई-वडिलांवरही संशयाची सुई होतीच. चिमुकली बादली पडली कशी? आणि बादलीवर झाकण कसे? याचा थांगपत्ता लागत नव्हता. तीन दिवस चौकशी आणि तपास केल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा घरातील 4 वर्षे आणि 6 वर्षाच्या दोन बहिणींकडे वळवला.

पोलिसांनी या दोघींना विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सर्व घटना सांगितली आणि दुर्घटनेमागचे सत्य उलगडले. मुली इतक्या लहान आणि निरागस आहेत की त्यांनी काय चूक केली याची त्यांना कल्पना नव्हती. त्या दिवशी काय काय घडले ते बहिणींनी सर्व सांगितले.

काय आहे प्रकरण?

आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना त्या त्यांच्या टेडी बेअरशी खेळत होत्या. खेळून झाल्यावर मुलींनी टेडी बेअरला अंघोळ घातली आणि सुकण्यासाठी बाहेर लटकवले. त्यानंतर या बहिणींच्या डोक्यात त्यांच्या 2 महिन्यांच्या बहिणीला टेडी बेअरप्रमाणे बादलीत आंघोळ घालण्याची कल्पना आली.

दोघींनी दोन महिन्यांच्या बहिणीला पलंगावरून उचलून बाथरूममध्ये आणले. त्यांनी तिला बादलीच्या काठावर आंघोळ घालायला सुरुवात केली. दुर्दैवाने, यावेळी चिमुकली त्यांच्या हातून निसटली आणि बादलीत पडली. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही दोन्ही मुली तिला बाहेर काढू शकल्या नाहीत. घाबरून त्यांनी बादलीचे झाकण लावले आणि बाथरूममधून बाहेर गेल्या.

काही वेळाने मुलगी बेडरुममध्ये नसल्याचे आईच्या लक्षात आले. तिने वडिलांना फोन करुन मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले. सुरवातीला दारावर आलेल्या भिकारी महिलेने तिला नेले असावे असा संशय होता. पण पोलिसांनी घराची झडती घेतली असता बाथरुममधील बादलीत मुलीचा मृतदेह आढळून आला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.