पाऊस आला म्हणून झाडाखाली उभे राहिले, त्याच झाडावर वीज कोसळली अन्…

पावसापासून बचाव करण्यासाठी तिघेही जण शेतातील शेवग्याच्या झाडाखाली उभे राहिले. मात्र दुर्दैवाने याच झाडावर अचानक वीज कोसळली अन् होत्याचं नव्हतं झालं. या घटनेत आबा चव्हाण आणि त्यांच्या 14 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

पाऊस आला म्हणून झाडाखाली उभे राहिले, त्याच झाडावर वीज कोसळली अन्...
चाळीसगावमध्ये बाप-लेकाचा करुण अंतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 8:49 PM

जळगाव / खेमचंद कुमावत (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील न्हावे शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. शेतात काम करत असताना पाऊस (Rain) आल्याने झाडाखाली उभ्या राहिलेल्या बाप-लेकावर वीज कोसळल्याने पित्यासह मुलावर अचानक वीज (Lightening) कोसळल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याच्या घटनेने जळगावात खळबळ उडाली आहे. या घटनेत एक महिला सुदैवाने बचावली आहे. आबा शिवाजी चव्हाण असे 45 वर्षीय मयत पित्याचे नाव आहे. त्यांचा 14 वर्षाचा मुलगाही यात मयत झाला आहे.

शेतपीकाला खत देण्यासाठी गेले होते शेतावर

चाळीसगाव तालुक्यातील न्हावे गावातील आबा शिवाजी चव्हाण यांची न्हावे शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीवर कापूस आणि तुरीच्या शेंगांची लागवड करण्यात आली आहे. या कपाशीला खत देण्यासाठी आबा चव्हाण हे पत्नी आणि मुलासह दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शेतात गेले होते.

पाऊस आला म्हणून शेवग्याच्या झाडाखाली उभे राहिले

यादरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी तिघेही जण शेतातील शेवग्याच्या झाडाखाली उभे राहिले. मात्र दुर्दैवाने याच झाडावर अचानक वीज कोसळली अन् होत्याचं नव्हतं झालं.

हे सुद्धा वाचा

सुदैवाने महिला थोडक्यात बचावली

या घटनेत आबा चव्हाण आणि त्यांच्या 14 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी या घटनेत महिला थोडक्यात सुदैवाने बचावल्या आहेत. बापलेकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे चाळीसगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मयताच्या पाश्चात पत्नी, मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे न्हावे गावात शोककळा पसरली आहे.

तात्काळ मदत जाहीर

चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मृतांची पाहणी केली. पीडित कुटुंबाचे सांत्वन करत आठ लाख रुपये मदत कुटुंबाला देण्याचे आश्वासन दिले.

घटनेला तीन तास उलटूनही पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच शेतात पडलेले मृतदेह खांद्यावर उचलून रुग्णवाहिकेपर्यंत नेले. पोलीस प्रशासन वेळेत न पोहोचल्याने नातेवाईकांनी रोष व्यक्त केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.