Jyoti Maurya Case | ज्योती मौर्यच्या कथित प्रियकरावर काय कारवाई? चौथी पास नवऱ्याचे अधिकारी पत्नीवर गंभीर आरोप

Jyoti Maurya Case | "मी दोघांना हॉटेलमधून निघताना रंगेहात पकडलं" असं आलोकने म्हटलं. "ज्योती आणि मनीषने हॉटेल रुममध्ये अनेक रात्री एकत्र घालवल्यात" असा आरोप आलोकने केला.

Jyoti Maurya Case | ज्योती मौर्यच्या कथित प्रियकरावर काय कारवाई? चौथी पास नवऱ्याचे अधिकारी पत्नीवर गंभीर आरोप
Jyoti Maurya Manish Dubey
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 2:15 PM

लखनऊ : सध्या सोशल मीडिया आणि उत्तर प्रदेशात SDM Jyoti Maurya प्रकरण गाजत आहे. नवऱ्यानेच सरकारी अधिकारी असलेल्या ज्योती मौर्यवर विवाहबाह्य संबंधाचा गंभीर आरोप केला आहे. त्याने ज्योती मौर्यचा कथित प्रियकर मनीष दुबे विरोधात FIR नोंदवण्याची मागणी केली आहे. ज्योतीचा नवरा आलोकने मनीषच नाव घेतलं. ज्योतीचे मनीष बरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला.

उत्तर प्रदेश सरकारला खातेनिहाय चौकशीचा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. होम गार्डचे डीजी बिजय मौर्य यांनी मनीष दुबे विरोधात FIR ची मागणी केली आहे. त्याला निलंबित करण्याची सुद्धा मागणी केलीय. आलोकने त्याच्याविरोधात हत्येचा कट रचल्याचा आरोप केलाय. त्याची चौकशी झाली पाहिजे असं बिजय मौर्य यांनी म्हटलं आहे.

मनीष दुबेवर आरोप काय?

मनीष दुबेला निलंबित करण्याची आणि त्याच्या विरोधात FIR ची मागणी केलीय. त्यावर सरकार लवकरच निर्णय घेईल, असं सूत्रांनी सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय. मनीष दुबे होम गार्डचा कमांडट म्हणून गाझियाबादमध्ये पोस्टिंवर आहे. विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका मनीषवर ठेवण्यात आला आहे. त्याला पदावरुन निलंबित करण्याती शिफारस करण्यात आलीय.

अनेक रात्री एकत्र घालवल्याचा आरोप

ज्योती मौर्य मोठ्या हुद्दयावरील सरकारी अधिकारी आहे. नवऱ्याने तिच्यावर विवाहबाह्य संबंधांचा गंभीर आरोप केला आहे. “ज्योतीच्या लखनऊला फेऱ्या वाढल्या होत्या. मला तिच्यावर संशय आला. म्हणून मी तिचा पाठलाग केला. त्यावेळी मी दोघांना हॉटेलमधून निघताना रंगेहात पकडले” असं आलोकने म्हटलं. “ज्योती आणि मनीषने हॉटेल रुममध्ये अनेक रात्री एकत्र घालवल्यात” असा आरोप आलोकने केला. चॅट व्हायरल झाले

ज्योती आणि मनीषने मिळून मला मारण्याचा कट रचला होता, असा आलोकचा आरोप आहे. ज्योती आणि मनीषचे काही चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. “आयटी कायद्याच्या कलमातंर्गत माझ्या नवऱ्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलीस तपास करुन पुरावे गोळा करतील” असं ज्योती मौर्यने सांगितलं. ज्योती मौर्यच आलोक बरोबर पटत नव्हतं, म्हणून तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आलोक फक्त चौथी पास नवरा.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.