Murder : जिला देवी समजून दत्तक घेतलं, तिनेच आई-बापाचा जीव घेतला! का? तर प्रियकरासाठी
Kanpur Murder Case : हत्या करुन या हत्येचा आरोप सुनेच्या कुटुंबीयांवर लावण्याचा तिला प्लान होता.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Murder News) कानपूरमध्ये नवरा-बायकोची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांच्याच मुलीनं केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. या घटनेनं सगळेच हादरलेत. प्रियकराच्या (Boy friend) मदतीने मुलीने आपल्याच आई वडिलांचा जीव घेतलाय. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीला दत्तक घेण्यात आलं होतं. 24 वर्षांपूर्वी या मुलीला दत्तक घेत तिच्या पालकांनी सांभाळ केला. तिला लहानाचं मोठं केलं. पण प्रॉपर्टीच्या वादातून (Property Dispute) तिने आपल्याच आई वडिलांचा जीव घेतलाय. आई वडील आपली सगळी प्रॉपर्टी सुनेला देणार होते. यामुळे नाराज झालेल्या मुलीने आपल्या आई-वडीलांचा खून केला. आपण जणू काही केलंच नाही, असा बनाव या मुलीनं रचला होता. पण पोलिसांनी केलेल्या तपासातून या मुलीनं आपल्याला आयुष्य दिलेल्या आई-वडिलांचाच घात केल्याचं समोर आलंय.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेश पोलिसांनी या हत्येप्रकरणी कोमल उर्फ आकांक्षाला अटक केली आहे. मृत मुन्नालाल यांना एकही मुलगी नव्हती. त्यामुळे त्यांनी 24 वर्षांपूर्वी कोमलला दत्तक घेतलं होतं. आपलेच नातेवाईक छोटेलाल कडून कोमलला दत्तक घेण्यात आलं होतं. मुन्नालाल यांना एक मुलगाही होता. त्याचं लग्न होऊन त्याच्या संसारात वाद सुरु होते.
मुन्नालाल यांच्या सुनेनं हुंडा केल्याप्रकरणी कुटुंबीयांवर खटला दाखल केला होता. हे प्रकरण मिटण्यासाठी सुनेच्या कुटुंबीयांनी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. मुन्नालाल यांच्याकडे इतके पैसे नव्हते. त्यांच्याकडे फक्त घर आणि थोडा बँक बँलन्स होता. पण मुन्नालाल यांच्या दत्तक घेतलेल्या मुलीला सगळी प्रॉपर्टी आणि पैसे हवे होते. प्रियकरासोबत आयुष्य घालवण्यासाठी तिचा डोळा वडिलांच्या प्रॉपर्टीवर होता.
कोमलने आपल्याच आई-वडिलांच्या हत्येचा कट रचला. हत्या करुन या हत्येचा आरोप सुनेच्या कुटुंबीयांवर लावण्याचा तिला प्लान होता. तिने आधी आपल्या आई-वडील आणि भावाला विष कालवलेला ज्यूस दिला. त्यानंतर तिघेही बेशुद्ध पडले.
कोमले आपल्या प्रियकराच्या मदतीने आई-वडिलांचा खून केला. त्यानंतर ती स्वतः भावाला उठवण्यासाठी गेली आणि तिने आई वडिलांची हत्या झाली असल्याचा बनाव रचला. यानंतर प्रकरण पोलिसांत गेलं. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशी केल्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. सीसीटीव्ही फुटेजसोबत पोलिसांनी कोमलचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यातून जी माहिती समोर आली, त्याने पोलीसही चक्रावून गेले होते. अखेर कोमल आणि तिचा प्रियकर असलेल्या रोहितलाही पोलिसांनी अटक केली आहे.