Pakistan Flag : चक्क पाकिस्तानचा झेंडा घरावर फडकवला! यूपीतील व्हिडीओ व्हायरल, आरोपीला अटक
Independence Day News : पोलिसांनी खबरदारी म्हणून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या मुलाच्या घरावरील पाकिस्तानचा ध्वज खाली उतरवण्यात आला.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh News) कुशीनगरमध्ये एका युवकाने चक्क घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकवला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यामुळे अखेर कारवाई करण्यात आली. त्यांतर पोलिसांनी पाकिस्तानचा झेंडा (Pakistan flag) उतरवला आणि गुन्हाही दाखल करुन घेतला. पोलिसांनी याप्रकरणी 21 वर्षांच्या एका तरुणासह त्याच्या आत्यालाही ताब्यात घेतलं असून आरोपी तरुणाची चौकशी केली जाते आहे. याप्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अटक (UP crime News) करण्यात आलेल्या आरोपीचं नाव रफीक असून त्याने नेमकं असं का केला, याचा तपास आता केला जातोय. याप्रकराचामुळे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशातील या घटनेमुळे चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, संपूर्ण देशभरात आझादी का अमृतमहोत्सव साजरा केला जातोय. घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचं आव्हान केलं होतं. त्यानंतर यूपीतील तरुणानं तिरंग्याऐवजी पाकिस्तानचा ध्वज फडकवल्यानं संताप व्यक्त केला जातोय.
कळलं कसं?
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताऐवजी तरुणाने पाकिस्तानचा ध्वज फडकवला. स्वातंत्र्यदिनाच्या शांततेला भंग करण्यासाठी हे कृत्य करण्यात आलं, असण्याचा संशय व्यक्त केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघरी, प्रत्येक गावात, शहरात तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर विशेष उपक्रमही प्रशासकीय यंत्रणेकडून राबवला गेला होता. मात्र उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेत, रफीक नावाच्या 21 वर्षीय तरुणानं आपल्या घराच्या धतावर पाकिस्तानचा झेंडा फडकवला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे, याचा शोध घेतला जाऊ लागला. तपासादरम्यान, हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधील बेंदूपार मुस्तकिल गावातील असल्याचं समोर आलं.
पाहा व्हिडीओ :
A man named Saad Mohammad Ansari put up the Pakistan flag on his house in Kushinagar, UP
Ansaris are generally Pasmanda that BJP wants to woo, so no bulldozer action can be expected on his house unlike Shrikant Tyagi pic.twitter.com/5s4JNposJQ
— Girish (@vikramaditya205) August 13, 2022
आरोपीची चौकशी सुरु
पोलिसांनी खबरदारी म्हणून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या मुलाच्या घरावरील पाकिस्तानचा ध्वज खाली उतरवण्यात आला. तसंच रफिकला पोलिसांनी अटक केली. रफिकसह त्याच्या आत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सध्या रफिकची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे.
आत्येने मागितली माफी
दरम्यान, कुटुंबांनी रफिकला असं करण्यापासून मज्जाव केला होता. पण रफिकने घरातल्यांचं न ऐकता, हट्ट केला आणि पाकिस्तानचा झेंडा घरावर फडकवला. पाकिस्तान झेंडा फडकवणाऱ्या तरुणाच्या आत्येनेच हा झेंडा शिवला होता. सगळेजण घरावर झेंडा फडकवत आहेत, तर मी ही इस्लामिक ध्वज लावेन, असं ठरवलं होतं. शिवताना मला तो झेंडा आवडला होता. पण माझ्याकडून चूक झाली. मी सगळ्यांची माफी मागते, यापुढे असं नाही होणार, असं आरोपी तरुणाच्या आत्येनं म्हटलंय.