इन्स्टाग्रामवर मैत्री, फोटो मॉर्फ करुन तरुणीला ब्लॅकमेल, 21 वर्षीय आरोपीला बेड्या

आपले फोटो मॉर्फ करुन इन्स्टाग्राम युजर ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार 13 वर्षीय तरुणीने पोलिसात केली (Minor Girl Instagram Photo Morphing)

इन्स्टाग्रामवर मैत्री, फोटो मॉर्फ करुन तरुणीला ब्लॅकमेल, 21 वर्षीय आरोपीला बेड्या
अल्पवयीन तरुणीचे फोटो मॉर्फ करुन धमकी
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 10:53 AM

नवी दिल्ली : अल्पवयीन तरुणीचा फोटो एडिट करुन ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री करुन आरोपी 13 वर्षीय मुलीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. पीडितेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (UP Youth befriends Minor Girl on Instagram Blackmails by Photo Morphing on Social Media)

इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवून जाळं पसरलं

आपले फोटो मॉर्फ करुन इन्स्टाग्राम युजर ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार 13 वर्षीय तरुणीने अलिपूर पोलिस ठाण्यात केली होती. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेला आरोपीने इन्स्टाग्रामवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती अॅक्सेप्ट केली. त्यानंतर मैत्री करुन त्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ मॉर्फ केले. हे फोटो इंटरनेटवर लीक करण्याची धमकी देत तो तिला ब्लॅकमेल करत होता.

आयपी अॅड्रेसद्वारे लोकेशन शोधलं

पोलिसांच्या सायबर टीमने आरोपीचा शोध घेतला. 21 वर्षीय आरोपीचं नाव मोहम्मद आमिर असल्याचं तपासात समोर आलं. आरोपी तिचे फोटो व्हायरल करण्याआधी त्याला जेरबंद करण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. त्याच्या आयपी अॅड्रेसद्वारे लोकेशन शोधून पोलिसांनी पुरावे जमा केले.

आरोपीला अटक करुन फोनही जप्त

आरोपी उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील नेहटोर गावाचा रहिवासी असल्याचं समजताच पोलिसांनी त्याची धरपकड केली. त्याने याआधीही काही जणींना ब्लॅकमेल केल्याचं तपासात पुढे आलं. दिल्ली पोलिसांनी पॉक्सो कायद्या अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी आमिरला अटक करुन त्याचा मोबाईल फोनही जप्त केला आहे.

रायगडमध्ये इन्स्टाग्राम मित्राकडून अत्याचार

इन्स्टाग्रामवर मैत्री करुन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यात उघडकीस आला होता. आरोपीने एका अल्पवयीन तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. ही तरुणी कॉलेजवरुन एकटीच पायी घरी येत होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करुन प्रेम प्रकरणाबाबत आई-वडिलांना सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी तरुणीला ब्लॅकमेल करु लागला. तसेच तिला मुंबई-गोवा महामार्गावरील लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

संबंधित बातम्या :

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अहमदनगरमध्ये हनी ट्रॅपचं सत्र सुरुच, क्लास वन अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडीओ काढून 3 कोटी मागितले

(UP Youth befriends Minor Girl on Instagram Blackmails by Photo Morphing on Social Media)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.