…तेव्हा अंगावर एकही कपडा नव्हता, पोलिसवाला शेजारीच होता, विवाहितेचे हादरवून टाकणारे आरोप
पीडितेने कोर्टात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरुन आरोपी शिपायाविरोधात अनेक कलमातंर्गत गुन्हा नोंद झाला आहे. ज्या घरात पीडिता रहायची, त्या घर मालकिणी विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

एका पोलिसाने महिलेच्या अन्नात नशेचा पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी कॉन्स्टेबल इथेच थांबला नाही, तर महिलेला धमकावून त्याने त्याचे अत्याचार सुरुच ठेवले. या घाणेरड्या कामात आरोपी पोलीस शिपायाला घर मालकिणीने देखील साथ दिली. पीडित महिलेच्या पतीला या बद्दल समजल्यानंतर त्याने महिलेला सोडून दिलं. पीडितेने आरोपी शिपायाविरोधात पोलिसांकडे दाद मागितली. पण कोणी काही ऐकून घेतलं नाही, असं पीडितेच म्हणणं आहे. उत्तर प्रदेशच्या अकबरपूरमधील हे प्रकरण आहे.
पीडित महिलेने कोर्टात आरोपी शिपाई आणि घर मालकिणीविरोधात तक्रार केली. कोर्टाच्या आदेशावरुन दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पीडित महिला आणि आरोपी पोलीस शिपाई एकाच घरात भाड्यावर राहत होते. महिलेच्या आरोपानंतर शिपायाविरोधात अकबरपूर कोतवालीत एससी, एसटी कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणात घर मालकिणी विरोधातही गुन्हा नोंद झालाय.
शिपाई आणि घर मालकिणीचे खूप चांगले संबंध
अकबरपुर कोतवाली क्षेत्रात मोहल्ला जौहरडीह येथे एक महिला भाड्याच्या घरात राहत होती. ती मूळची जलालपुरची निवासी आहे. अकबरपुर कोतवाली येथे राहून ती अभ्यास करत होती. पीडितेने कोर्टात धाव घेत आरोप केला की, याच घरात शिपाई राहतो. तो मूळचा प्रतापगढचा आहे. शिपाई आणि घर मालकिणीचे खूप चांगले संबंध आहेत, असा पीडित महिलेने आरोप केला. घर मालकिणीकडून शिपायाने माझा फोन नंबर मिळवला व फोनवर घाणेरडे मेसेज करुन मला त्रास देत होता.
अंगावर एकही कपडा नव्हता
पीडितेचा आरोप आहे की, एक दिवस पोलीस शिपायाने तिला जेवण देऊ केलं. पीडितेने खायला नकार दिला, तेव्हा घर मालकिण तिथे आली. अन्न तर आहे, खाऊन घे असं तिला म्हणाली. तिच्यावर विश्वास ठेऊन पीडितेने ते अन्न खाल्लं. ते खाल्ल्यानंतर तिची शुद्ध हरपली. तिचा आरोप आहे की, शुद्ध आली तेव्हा माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यावेळी आरोपी शिपाई शेजारीच होता. त्याने धमकावलं की, जे मी सांगतो ते ऐकावच लागेल, नाहीतर सगळं तुझ्या नवऱ्याला सांगेन.
त्याने सर्व तिच्या नवऱ्याला सांगितलं
आरोपीने त्यानंतर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचा पीडितेचा आरोप आहे. महिलेने विरोध केल्यानंतर त्याने सर्व तिच्या नवऱ्याला सांगितलं. त्यानंतर नवऱ्याने पीडित महिलेला सोडून दिलं. पीडितेने पोलीस अधिकाऱ्यापासून एसपी पर्यंत तक्रार केली, पण कोणी तिचं म्हणणं ऐकलं नाही, असं पीडितेच म्हणणं आहे.
