‘तो रोज माझ्या बायकोशी…’, सासू-जावई लव्हस्टोरीमध्ये नवीन खुलासा
सासू-जावई लव्ह स्टोरी प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अपना देवीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने खूप संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "कोणाला वाटलं नव्हतं की, ती असं वागेल. ते दोघे गावात दिसले तर त्यांना मारुन टाकलं पाहिजे. तिच्यामुळे दुसऱ्या महिला बदनाम होत आहेत. आता महिलांवर कोण विश्वास ठेवेल?"

उत्तर प्रदेशच्या अलीगढमधून फरार झालेल्या सासू-जावयाच्या जोडीबद्दल गावकऱ्यांमध्ये रोष आहे. अपनी देवी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून गेली. दिसली तर मारुन टाकणार इतका गावकऱ्यांच्या मनात तिच्याबद्दल राग आहे. अपना देवीच्या शेजारी राहणारी महिला म्हणाली की, तिने गावाची बदनामी केली. तिच्यामुळे दुसऱ्या बायकासुद्धा बदनाम होत आहेत. अशा महिलेला जगण्याचा काही अधिकार नाही. सासूसोबत पळालेला जावई राहुलच्या गावातही त्यांच्याबद्दल तितकाच राग आहे. राहुलच्या गावातले सुद्धा अपना देवीला दोषी मानत आहेत.
त्यांच्या मते राहुल एक सभ्य मुलगा आहे. सासूने त्याच्यावर जादू टोणा केला. त्यामुळे तो तिच्यासोबत निघून गेला. अपना देवीने वशीकरण केल्याचा आरोप गावच्या प्रमुखाने केलाय. “राहुल सर्वांचा आदर करायचा. तो अवघ्या 20 वर्षांचा आहे. या वयात विचार करण्याची, समजण्याची शक्ती नसते. सासूने होळीच्या दिवशी त्याला ताबीज बांधली होती. हे प्रकरण वशीकरणाच आहे. राहुल 18 वर्षाच्या मुलीला सोडून सासूसोबत का पळून जाईल?” असे प्रश्न गावच्या प्रमुखाने उपस्थित केलेत.
त्याच गावात राहणाऱ्या गीताच म्हणणं आहे की….
मनोहरपूर येथे अपना देवीच घर आहे. त्याच गावात राहणाऱ्या गीताच म्हणणं आहे की, जावयासोबत पळून गेलेल्या अपना देवीला जगण्याचा काही अधिकार नाही. अशी महिला गावाच्या बदनामीच कारण बनलीय. कोणाला वाटलं नव्हतं की, ती असं वागेल. ते दोघे गावात दिसले तर त्यांना मारुन टाकलं पाहिजे. तिच्यामुळे दुसऱ्या महिला बदनाम होत आहेत. आता महिलांवर कोण विश्वास ठेवेल?
लग्नाच्या पत्रिका सुद्धा वाटल्या गेल्या होत्या
पीडित जितेंद्र कुमार अपना देवीचे पती आहेत. ते कुटुंबासह मनोहरपूर गावात राहतात. त्यांना पत्नी आणि मुलगी आहे. मुलीच लग्न छर्रा भागात राहणारा युवक राहुलसोबत ठरलं होतं. लग्नाच्या पत्रिका सुद्धा वाटल्या गेल्या होत्या. पण लग्नाच्या 9 दिवस आधी राहुल होणाऱ्या सासूसोबत पळून गेला.
त्याच फोनवरुन तो रोज माझ्या बायकोशी बोलायचा
पती जितेंद्र म्हणाले की, मला फक्त एकदा अपना देवीचा चेहरा बघायचा आहे. आमच्यासाठी ती अशी सुद्धा मेलीय. घरी तर आम्ही तिला येऊ देणार नाही. राहुलने माझ्याकडे नवीन फोन मागितला होता. मी त्याला नवीन फोन घेऊन दिला. त्याच फोनवरुन तो रोज माझ्या बायकोशी बोलायचा. आम्हाला कुठे माहित होतं, दोघे असे दिवस दाखवतील.
लोकेशन ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरु
मुलाचे वडिल ओमवीर यांची सुद्धा पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी करण्यात आली. चार दिवसांपासून राहुलचे मेहुणे योगेश यांना सुद्धा पोलीस ठाण्यात बसवून चौकशी सुरु आहे. सासू आणि जावयाचे फोन बंद आहेत. त्यांचं लोकेशन ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.