मामा-मामीसह तिघा भावंडांची गळा चिरुन हत्या, जमिनीच्या लोभातून कुटुंब संपवलं

आरोपीने सख्खा मामा-मामी आणि त्यांच्या तीन मुलांची राहत्या घरी गळा चिरुन हत्या केली. (Ayodhya Nephew Killed Uncle's Family)

मामा-मामीसह तिघा भावंडांची गळा चिरुन हत्या, जमिनीच्या लोभातून कुटुंब संपवलं
अयोध्येत पाच जणांच्या हत्येने खळबळ
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 11:07 AM

लखनौ : जमिनीच्या वादातून भाच्यानेच मामा-मामीसह तिघा मामेभावंडांची गळा चिरुन हत्या केली. उत्तर प्रदेशातील अयोध्येत पाच जणांच्या सामूहिक हत्याकांडाने एकच खळबळ (Ayodhya Five People Murder) उडाली आहे. सख्ख्या मामाच्या कुटुंबातील पाच जणांना संपवणाऱ्या क्रूर भाच्याच्या शोधासाठी पोलिसांनी छापेमारी सुरु केली आहे. (Uttar Pradesh Crime Ayodhya Nephew Killed Five Members of Uncle’s Family)

आरोपीने सख्खा मामा-मामी आणि त्यांच्या तीन मुलांची राहत्या घरी गळा चिरुन हत्या केली. प्राथमिक तपासानुसार दोघांमध्ये प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होते. हत्येनंतर आरोपी भाचा घटनास्थळावरुन पसार झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांचीही या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे.

आरोपी भाचा-मामा एकाच घरात राहणारे

अयोध्येतील निसारु गावात आरोपी भाचा आपल्या मामाच्या कुटुंबासोबत एकाच घरात राहत होता. जमिनीवरुन दोघांमध्ये दीर्घ काळापासून वाद सुरु होते. शनिवारी रात्री मामाचं कुटुंब झोपेत असताना भाच्याने त्यांचे गळे चिरले. हे वृत्त गावात वाऱ्यासारखं पसरलं आणि एकच खळबळ उडाली.

घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा

मयत कुटुंबाच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमाव जमा झाला. पोलिसांचा फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी शैलेश पांडे यांच्या अंदाजानुसार मालमत्तेच्या वादातून भाच्यानेही ही हत्या केली आहे. आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी केली जात आहे. जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनीही या प्रकरणी कोणतीही हयगय होणार नाही, अशी ग्वाही दिली. पाच जणांचे मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

वर्षभरापूर्वी पतीचं निधन, आता दिराने वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन संपवलं!

(Uttar Pradesh Crime Ayodhya Nephew Killed Five Members of Uncle’s Family)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.