Uttar Pradesh Crime : ‘मी कृष्णाचा अवतार, तू माझी राधा!’ अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळाला दादा

भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीनं त्यांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिल्याचं किशोरीचं म्हणणंय.

Uttar Pradesh Crime : 'मी कृष्णाचा अवतार, तू माझी राधा!' अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळाला दादा
उत्तर प्रदेशातील अजब घटना..Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 1:26 PM

मी कृष्णाचा आणि माझी प्रेयसी राधेचा अवतार आहे, असं उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) एक तरुण नुसत सांगतच नाही सुटला, तर त्याने चक्क मुलीला पळवून आणलं आणि श्रीकृष्ण मंदिरात (Srikrishna Temple) लग्नही करुन टाकलंय. उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये हा अजब प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या एका मुलीनं मथुरेतील (Mathura) वृन्दावन इथं असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन लग्न करुन टाकलं. तर दुसरीकडे या मुलीच्या आईवडिलांनी आपली मुलीचं अपहरण आणि बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसात देऊन टाकली. ही मुलही 30 मे रोजी एका भंडाऱ्याला गेली होती. आपल्या आईसोबत गेलेली ही मुलगी अचानक अंकित तिवारी नावाच्या एका मुलासोबत पळून गेली. पळून गेलेल्या या मुलीचं नाव किशोरी आहे. किशोरी राधेचं रुप असून अंकित स्वतःला कृष्णाचा अवतार असल्याचं सांगत सुटलाय.

अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल

किशोरीच्या नातलगांना अंकितच्या विरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्याच दरम्यान, ही मुलगी बांदा पोलीस ठाण्यात आल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मिळाली. बांदातील पोलीस कर्मचारी किशोरीला घेऊन कोतवाली इथं गेले. तिथं तिची मेडिकल टेस्ट करण्यात आली.

आता ही मुलगी अल्पवयीन आहे की नाही, यावरुन सगळं प्रकरण अडलंय. मी माझ्या मर्जीनं हे लग्न केल्याचं मुलीनं पोलिसांनी म्हटलंय. भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीनं त्यांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिल्याचं किशोरीचं म्हणणंय. त्यामुळे आता अंकितशी लग्न केल्याप्रकरणी नेमकी कारवाई काय करावी, असा पेच पोलिसांना पडलाय.

हे सुद्धा वाचा

गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंकित तिवारी नावाच्या मुलावर हा गुन्हा करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. किशोरी मूळची उत्तर प्रदेशच्या गिरवा ठाणा पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणारी असून ती आपल्या नातलगांसोबत बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गंजा गावात आली होती.

गावातील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची ती कुटुंबीयांसोबत आलेली होती. यावेळी एक होम केला जाणार होता. त्या होमासाठी आलेली किशोर कृष्णाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या कथित प्रियकर अंकित सोबत पळली होती. पळून जाऊन या दोघांनी लग्नही केलं. त्यानंतर कुटुंबीयांनी अंकितविरोधात सनसनाटी आरोप केलेत. आता पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास सुरु आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.